पीएम किसानच्या यादीत तुमचं नाव आहे का?, असं करा झटपट चेक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता (PM Kisan Yojana) लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र यासाठी शेतकऱ्याचं नाव लाभार्थ्यांच्या यादीत असावं. मात्र ते नाव जर लाभार्थ्यांच्या यादीत नसेल तर शेतकऱ्यांच्या खात्यात 17 वा हप्ता येणार नाही. जर लाभार्थी शेतकऱ्याचं नाव जर योजनेत आलं नसेल तर काळजी करू नका.   (PM Kisan Yojana)

किसान योजनेतून नाव काढल्यास काय करावं?

PM Kisan Yojana मध्ये नाव कपात केले जाते. लाभार्थ्याने चुकीची माहिती दिल्याने देखील नाव कपात करण्यात येते. लाभार्थी शेतकऱ्याचं बँक खाते, आधारकार्ड बँक खात्याला जोडले नसल्यास, अर्जदाराचे वय हे 18 पेक्षा कमी असल्यास, ई-केवायसी केले नसल्यास अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं. यासाठी एक गोष्ट मात्र करावी लागेल. (PM Kisan Yojana)

pmkisan.gov.in वर क्लिक करा आणि आपले खाते लॉग ईन करा. उजव्या बाजूला Farmers Corner पर्याय निवडा. Beneficiary Status पर्याय निवडून त्यामध्ये बँक खाते आणि आधारची तपशील जोडा. त्यानंतर खात्यात रक्कम आली की नाही हे पाहावं. Know Your Status निवडून आपण आपला रजिस्ट्रेशन क्रमांक टाकावा. (PM Kisan Yojana)

जर आपल्याकडे रजिस्ट्रेशन क्रमांक नसेल तर मोबाईल नंबर नमूद करावा. Captcha कोड त्याठिकाणी दिसेल तो कोड टाकावा आणि त्यानंतर ओटीपी येईल त्याआधारे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला समजेल. त्यानंतर होममध्ये जाऊन  Know Your Status वर क्लिक करा. पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा.

त्यानंतर तुम्हाला Beneficiary List हा पर्याय सापडेल, त्याठिकाणी राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव या सर्वांची निवड करून याबाबत माहिती भरून घ्यावी. Get Report चा पर्याय निवडा. तेव्हा तुमच्यासमोर Beneficiary List येईल. जर तुमचे नाव यादीत नसेल तर पीएम किसानच्या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करू शकता.

पीएम किसान हेल्पलाईन क्रमांक

पीएम किसान हेल्पलाईन 155261, 18001155266 , 011-24300606, 011-24300606 यावर कॉल करा. पीएम किसान लँडलाई 011-23381092 , 011-23382401 काॅल करून माहिती मिळवू शकता.

News Title – Pm Kisan Yojana Installment Name Deleted From PM Kisan Beneficiary List

 महत्त्वाच्या बातम्या

पुणे शहरातील पूर नियंत्रणासाठी मुरलीधर मोहोळ यांची मोठी योजना

“बहिणीने भावाच्या घरी जास्त दिवस थांबू नये”

प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कँडल प्रकरणी धक्कादायक खुलासा समोर!

“हार्दिकच्या नेतृत्वात प्रचंड अडचणी..”; ‘या’ दिग्गज खेळाडूचा पांड्याबाबत खळबळजनक दावा

अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या नवऱ्याला झालाय ‘हा’ गंभीर आजार; प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर