“हार्दिकच्या नेतृत्वात प्रचंड अडचणी..”; ‘या’ दिग्गज खेळाडूचा पांड्याबाबत खळबळजनक दावा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hardik Pandya | मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या कामगिरीबाबत आता अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत. आयपीएलमधील मुंबईचे आव्हान आता जवळपास संपुष्टात आले आहे. हार्दिकच्या मैदानावरील निर्णयावर बऱ्याच जणांनी प्रश्न निर्माण केलेत. आता एका दिग्गज खेळाडूने पांड्याबाबत एक खळबळजनक दावा केला आहे.

इरफान पठाण याने हार्दिक पांड्याला लक्ष्य केलं आहे. त्याने अगदी सुरुवातीपासून हार्दिकवर बोट ठेवलंय. आता तर थेट हार्दिकच्या नेतृत्वावरच इरफान पठाण याने सवाल केला आहे. काल (3 मे) झालेल्या सामन्यात मुंबईचा कोलकाताने घरच्या मैदानात 24 धावांनी पराभव केला.

मुंबईचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात?

माजी ऑलराऊंडर इरफान पठाणने मुंबई इंडियन्सच्या या पराभवासाठी हार्दिक पांड्याला जबाबदार ठरवलं आहे. त्याने पांड्याच्या कॅप्टनशिपवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवण्याचा निर्णय चुकीचा होता, असं इरफान पठाण म्हणाला आहे.

केकेआरने 57 रन्सवर 5 विकेट गमावलेले होते. मात्र, नंतर कोलकाताचा डाव व्यंकटेश अय्यर आणि मनीष पांडे यांनी सावरला. दोघांच्या शानदार भागीदारीच्या बळावर केकेआर टीमने 169 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या मुंबईच्या टीमला फक्त 145 धावा करता आल्या. या पराभवानंतर हार्दिकला (Hardik Pandya) पुन्हा ट्रोल केलं जातंय.अशात इरफान पठाणने देखील त्याच्याबद्दल मोठे सवाल केले आहेत.

काय म्हणाला इरफान पठाण?

“क्रिकेटमध्ये कॅप्टनचा रोल महत्त्वाचा असतो. पण, पांड्याच्या नेतृत्वात अनेक समस्या दिसून येत आहेत. MI ची टीम कागदावर खूप मजबूत दिसते. पण व्यवस्थापन योग्य होत नाही. हार्दिकचे निर्णय कोणाला समजतच नाहीयेत.एकवेळ कोलकाताचे 5 विकेट पडले होते. मात्र , नमन धीरला 3 ओव्हर गोलंदाजी देण्याचा चुकीचा निर्णय घेतला गेलं.त्यानंतर केकेआरची पार्ट्नरशिप झाली आणि लवकर ऑल आऊट करण्याची संधी MI ने गमावली.”, असं इरफान पठाण म्हणाला आहे.

इतकंच नाही तर, “हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पहिल्यापासूनच चुका करतोय. त्याच्या नेतृत्वाखाली टीम एकजुटीने खेळत नाहीये, ही एक मोठी समस्या आहे. कॅप्टनला सर्व खेळाडूंनी स्वीकारलं पाहिजे.पांड्याबाबत असं होताना दिसत नाहीये. त्यामुळे IPL 2024 मध्ये टीमची स्थिती खराब आहे.”, असं इरफान पठाण याने म्हटलंय.

News Title: Irfan Pathan Questions Hardik Pandya Captaincy

महत्त्वाच्या बातम्या –

मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, वाचा हवामान खात्याचा अंदाज

हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये ‘या’ कलाकारांनी गमावलाय जीव; अपघात इतका भीषण की शरीराचा एक अवयवही..

..अन् थोडक्यात अनर्थ टळला! भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

“लग्नानंतरचे अनैसर्गिक संबंध गुन्हा नाही”; हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

“मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलंय?”; मोदींच्या टीकेवर शरद पवार यांचं जशास तसं प्रत्युत्तर