Indian Army Helicopter | महाड येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेची घटना ताजी असतांनाच आज (4 मे) अजून एक घटना घडली आहे. आज लष्कराचे नाशिकहून बेळगावकडे जाणाऱ्या एका हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड झाल्याने त्याचे आपत्कालीन लॅंडींग करावे लागले.चालकाने सांगली येथील एका शेतात हे विमान लँड केले.
आज लष्कराच्या हेलिकॉप्टरचा अपघात होता होता टळला. नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. हेलिकॉप्टरच्या पायलटने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टरचे एका शेतात लँडिंग केले. सांगली जिल्ह्यातील एरंडोली येथे हे लँडिंग करण्यात आलं.
लष्कराच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग
हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ते लँड करावे लागले. मिरज येथे काही व्यक्तींना हेलिकॉप्टरचा आवाज आल्याने तसेच ते हवेत हेलकावे खात असल्याचे दिसून आले. हेलिकॉप्टर (Indian Army Helicopter) ज्या ठिकाणी लँड झाले तिथे लगेच ग्रामस्थांनी धाव घेतली.
लष्कराचं हेलिकॉप्टर गावात उतरल्याने गावकऱ्यांनी ते पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. काही जणांनी तर त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला.मात्र,त्यांनी ग्रामस्थांना व्हिडिओ रेकॉर्ड न करण्याचे आवाहन केले.
या घटनेचे फोटो आता व्हायरल होत आहेत. हेलिकॉप्टर चालकाने प्रसंगावधान दाखवलं नसते तर मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे. वैमानिकाच्या हुशारीमुळे कुणालाही काही झाले नाही.
News Title – Indian Army Helicopter Emergency Landing in Sangli
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ भागांमध्ये येणार उष्णतेची लाट; हवामान खात्याचा इशारा
‘तू येच तुला आडवा करतो’; अरे शुभ बोल नाऱ्या…उद्धव ठाकरे भडकले
TMKOC मधील सोढीबाबत मोठी अपडेट समोर!
बारणेंना निवडणून आणण्यासाठी भाजप करतंय जिवाचं रान, ‘हा’ आहे खास प्लॅन
उर्फीला शिव्या घालणाऱ्यांनीही केलं तिचं कौतुक, उर्फीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल