‘या’ भागांमध्ये येणार उष्णतेची लाट; हवामान खात्याचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update |  हवामान विभागाने मोठी अपडेट दिली आहे. मे महिन्यामध्ये उष्णतेच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. येणाऱ्या आठवड्यापर्यंत याचा मोठा त्रास नागरिकांना सोसावा लागणार आहे. दरम्यान, उष्णतेसोबतच अवकाळी पावासाचे सावट राज्यावर राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (Weather Update) वर्तवला आहे. रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईमध्ये उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने (Weather Update) दिला. विदर्भ आणि मराठवाड्यातही उष्णतेच्या लाटेचा कहर पाहायला मिळणार आहे.

मे महिन्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता

मे महिन्यामध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात अनेक भागामध्ये उष्णतेत वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पूर्व भारतात 5 मे आणि इतर ठिकाणी 6 मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. आणि उन्हाची तिव्रता कमी होईल असा अंदाज देखील आहे. 5 आणि 6 मे रोजी इशान्य भारतात सोसायट्याचा वारा आणि विजांचा पाऊस पडणार आहे. (Weather Update)

सध्या आद्रतेचं प्रमाण हे कायम पाहायला मिळतंय. तर मुंबईमध्ये दिवसा आद्रतेचं प्रमाण हे 56 टक्के आणि रात्री 67 टक्के आद्रतेचं प्रमाण आहे. येत्या दोन दिवसांमध्ये आद्रतेत वाढ होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीये. (Weather Update)

तसेच हवामान विभागाने मुंबईकडे उत्तरेकडील वारे वाहत येणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता आहे. हे तापमान येत्या काळात 36 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला.

मुंबईच्या तापमानात चढ-उतार कायम राहणार

पुढील आठवड्याचा विचार केल्यास मुंबईच्या तापमानात चढ उतार राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 4 आणि 5 मे रोजी उन्हाचा पारा हा 35 अंश सेल्सिअसपर्यंत राहिल. त्यानंतर तापमानात घट होणार असल्याची शक्यता आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी उष्णतेच्या लाटेत 4 अंशांनी घट निर्माण झाली.

प्रदेशिक हवामान विभागानुसार गुरूवारी तापमानामध्ये 33 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानात घट पाहायला मिळाली आहे. त्यावेळी किमान अंश सेल्सिअस तापमान हे 27 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते मात्र आता ते तापमान हे  25.9 अंश सेल्सिअस झाले आहे.

News Title – Weather Update Heatwaves Of Maharashatra State

महत्त्वाच्या बातम्या

उद्योगपती अदानी यांना मोठा दणका; ‘या’ 6 कंपन्यांना कारणे दाखवा नोटिस

चित्रा वाघ यांनी तोंड उघडलं त्यांचे खूप आभार…- किरण माने

कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट; श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरेंची राजकीय खेळी?

सर्वात मोठी बातमी! शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

“स्वतःच्या बिझनेसच्या फायद्यासाठी संसदेत…”; अमोल कोल्हेंच्या आरोपांनी शिरुरच्या राजकारणात खळबळ