“मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलंय?”; मोदींच्या टीकेवर शरद पवार यांचं जशास तसं प्रत्युत्तर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Narendra Modi | महाराष्ट्राच्या राजकारणात आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उडी घेतली आहे. राज्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी ते आता राज्यातील महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघात जात प्रचार करताना दिसत आहेत. त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांना साधं कुटुंब सांभाळता आलं नाही ते महाराष्ट्र काय सांभाळणार?, असा टोला मोदींनी शरद पवार यांना लगावला आहे. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे. (Sharad pawar On Narendra Modi)

शरद पवार यांचं प्रत्युत्तर

कुटुंब सांभाळता येत नाही, महाराष्ट्र काय सांभाळणार?, असा सवाल मोदींनी शरद पवार यांना केला. आता याच प्रश्नावर शरद पवार यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. “मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं? मी त्यावर जाऊ इच्छित नाही. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी चिंताजनक आहे. पण आपण व्यक्तिगत बोलणार नाही,” असं म्हणत शरद पवार यांनी मोदींवर पलटवार केला.

“मोदी हे त्यांच्या 10 वर्षांच्या काळाची तुलना मनमोहनसिंह यांच्या कामाशी करत असतात. मनमोहनसिंह यांचे एक वैशिष्ट होतं की ते कोणत्याही कामाचा गाजावाजा न करता काम करायचे. मोदींच्या रिजल्टबाबत माहिती नाही,” असं म्हणत त्यांनी मोदींना सुनावलं आहे. (Sharad pawar On Narendra Modi)

उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत. संकटकाळात काम करणारा पहिला मिच असेल”, असं मोदी म्हणाले होते. त्यावर शरद पवार पलटवार करत म्हणाले की, “त्यांनी लाख म्हटलं असेल मात्र आमची अशी प्रार्थना आहे की उद्धव ठाकरे यांना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये”, असं म्हणत शरद पवार यांनी टोला लगावला.  (Sharad pawar On Narendra Modi)

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यासाठी किती वेळा आले आहेत. त्यांच्या येण्यावर आता शरद पवार यांनी मोदी आणि शहांना धारेवर धरलं आहे. “देशाचे पंतप्रधान किती वेळा देशात येतात. यातून त्यांच्यात आत्मविश्वास नाही असं दिसून येतं”, असं शरद पवार म्हणालेत.

नेमकं काय म्हणाले होते मोदी?

राष्ट्रवादी काँद्रेस पक्ष हा भाजपने फोडला असल्याचा विरोधकांचा दावा आहे. त्यावर नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, “राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आमच्यामुळे फुटला नाही. नेतृत्व कोण करणार? यावरून पवारांच्या घरातील भांडणं आहेत. कुटुंब सांभाळता आलं नाही, महाराष्ट्र काय सांभाळणार?”, अशी व्यक्तिगत टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

News Title – Sharad Pawar On Narendra Modi About  Over His remark Family Dispute

महत्त्वाच्या बातम्या

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय

अभिजीत बिचुकले ‘या’ बड्या नेत्याला देणार टक्कर; ‘या’ मतदार संघातून भरला अर्ज

शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळेल बक्कळ पैसा; जाणून घ्या कोणत्या राशींचे नशीब पालटणार?

धक्कादायक प्रकरणी अमोल कोल्हे पुरावे देणार, आढळराव राजकारणातून बाजूला होणार का?

⁠ऐकावं ते नवलच!, स्वतः वाघेरे करणार श्रीरंग आप्पा बारणेंना मतदान