शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळेल बक्कळ पैसा; जाणून घ्या कोणत्या राशींचे नशीब पालटणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Today Horoscope l मेष :- मनाची चलबिचलता जाणवू शकते. लहान प्रवास चांगला होईल. भावंडांची उत्तम साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायाच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. शुभ रंग जांभळा, शुभ अंक ८

वृषभ :- आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. विचारांना अधिक चालना देऊन पहावे. मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक ३

मिथुन :- उगाच कोणाच्या भरवश्यावर राहू नका. आवश्यक त्या गोष्टी समजावून घ्या. कार्यालयीन सहकार्‍यांची मदत मिळेल. नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल. व्यावसायिक गोष्टीत याच उपयोग होईल. शुभ रंग लाल, शुभ अंक ७

कर्क :- जुन्या दुखण्यांना गांभीर्याने घ्या. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील. भावनेला आवर घालावी लागेल. घरगुती प्रश्न सामोपचाराने सोडवा. कामातील निर्णय योग्य ठरतील. शनिदेवाच्या कृपेने अचानक धनलाभ संभवतो. शुभ रंग विटकरी, शुभ अंक १

Today Horoscope l सिंह :- अनोळखी लोकांशी व्यवहार टाळा. इतरांच्या मनीचे गुज जाणून घ्या. संमिश्र घटना घडू शकतात. मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक वातावरणात रमाल. शुभ रंग जांभळा, शुभ अंक ४

कन्या :- काही गोष्टी नरमाईने घ्या. भडक मत दर्शवू नका. तडजोडीने मार्ग काढावा. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. कामाची धांदल उडू शकते. शुभ रंग पोपटी, शुभ अंक ९

तूळ :- अहंकाराला खतपाणी घालू नका. बोलतांना इतरांच्या भावनेचा विचार करावा. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. मदतीला मागे हटु नका. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. शुभ रंग पिवळा, शुभ अंक २

वृश्चिक :- क्रोधवृत्तीला आवर घालावी. अचानक धनलाभ संभवतो. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. मौल्यवान वस्तु जपून ठेवा. अति विचार करू नका. शुभ रंग पांढरा, शुभ अंक ५

धनू :- पराक्रमाला वाव आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कामातून इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ शकते. तरूणांकडून नवीन विचार जाणून घ्याल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. शुभ रंग नारंगी, शुभ अंक८

मकर :- कामातून समाधान लाभेल. नातेवाईक भेटतील. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. कमिशन मधून लाभ कमवाल. वडीलांचे सहकार्य मिळेल. शुभ रंग काळा, शुभ अंक १

कुंभ :- जुगारातून लाभ संभवतो. कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्या खोडकरपणात रमून जाल. दिवस खेळीमेळीत जाईल. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक ७

Today Horoscope l मीन :- काहीशी मानसिक शांतता लाभेल. कोणतीही गोष्ट अविचाराने करू नका. घरगुती वातावरण हसते-खेळते राहील. जोडीदाराची चंगाली साथ मिळेल. भागीदारीत फार विसंबून राहू नका. शुभ रंग पांढरा, शुभ अंक ३

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक प्रकरणी अमोल कोल्हे पुरावे देणार, आढळराव राजकारणातून बाजूला होणार का?

⁠ऐकावं ते नवलच!, स्वतः वाघेरे करणार श्रीरंग आप्पा बारणेंना मतदान

‘मला काहीही बोला पण…’; पॉर्न फिल्मवरुन चित्रा वाघ, अंधारेंमध्ये जुंपली

प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट, राजकारणात खळबळ

गोविंदाची भाची रागिणी खन्नाचा धक्कादायक खुलासा!