कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Onion Export News l गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आठवड्याभरापूर्वी गुजरातमधील तब्बल 2 हजार टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीस केंद्र सरकारने परवानगी दिली होती. यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते.

निवडणुकीच्या काळात सरकारने घेतला मोठा निर्णय :

अशातच आता केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी हटवली आहे. मात्र निर्यातबंदी हटवली असली तरी, दुसऱ्या बाजूला 550 डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात शुल्क लागू करण्यात आली आहे. सरकारने निर्यात शुल्क आकारल्यामुळे देशात कांद्याच्या किंमती वाढणार नाहीत असं सरकारकडून बोललेलं जात आहे.

या निवडणुकांच्या काळातच सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने मागील वर्षी म्हणजेच 7 डिसेंबर 2023 ला निर्यातबंदी लागू करण्यात आल्याने याचा मोठा फटका शेतकरी आणि निर्यातदारांना बसत होता. मात्र त्यानंतर NCEL च्या माध्यमातून काही देशात निर्यात सुरू करण्यात आली होती. मात्र याबाबत वारंवार अनेक तक्रारी येत होत्या.

Onion Export News l कांद्याचे दर नियंत्रीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने घेतला निर्णय :

या सर्वप्रकारामुळे अखेर काल रात्री केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने हा नवा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचे निर्यातदारांनी स्वागत केले आहे. मात्र शेतकऱ्यांनाही निश्चित फायदा होणार असल्याच त्यांचं म्हणणं आहे. तसेच सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंधने हटवली असली तरीसुद्धा दुसऱ्या बाजूला निर्यातीवर शुल्क आकारले जाणार आहे.

कांद्याचे दर नियंत्रीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा निर्यातीवर शुल्क आकारल्यानं शेतकऱ्यांना होईल असे म्हणता येणार नाही. तसेच मागील वर्षी देखील कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लागू करण्यात आली होते. मात्र ही निर्यात शुल्क डिसेंबर 2023 पर्यंतच होती. अशातच आता पुन्हा सरकारने निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

News Title – Onion Export News

महत्त्वाच्या बातम्या –

अभिजीत बिचुकले ‘या’ बड्या नेत्याला देणार टक्कर; ‘या’ मतदार संघातून भरला अर्ज

शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळेल बक्कळ पैसा; जाणून घ्या कोणत्या राशींचे नशीब पालटणार?

धक्कादायक प्रकरणी अमोल कोल्हे पुरावे देणार, आढळराव राजकारणातून बाजूला होणार का?

⁠ऐकावं ते नवलच!, स्वतः वाघेरे करणार श्रीरंग आप्पा बारणेंना मतदान

‘मला काहीही बोला पण…’; पॉर्न फिल्मवरुन चित्रा वाघ, अंधारेंमध्ये जुंपली