Relationship | पती पत्नीचं नातं हे फार पवित्र मानलं जातं. आयुष्यभराची साथ म्हणून पती-पत्नी एकमेकांचे जोडीदार असतात. मात्र, कधी-कधी या नात्यात इतके वाद होतात की ते थेट कोर्ट-कचेरीपर्यंत पोहोचतात. असंच एक प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. या प्रकरणी हायकोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे.
ही घटना भोपाळमधील आहे. पतीविरुद्ध त्याच्या पत्नीने अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप करून दाखल केलेला एफआयआर मध्य प्रदेश हायकोर्टाने रद्द केलाय. याचा निकाल देताना कोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिलाय.
“लग्नानंतरचे अनैसर्गिक संबंध गुन्हा नाही”
न्यायमूर्ती जीएस अहलुवालिया यांच्या एकल खंडपीठाने (Relationship) सदरील प्रकरणी निर्णय देत म्हटलं की, कायदेशीररित्या विवाहित पत्नीसोबत पतीने अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवणे हा आयपीसीच्या कलम 377 नुसार गुन्हा ठरत नाही.
या आदेशमध्ये म्हटलं आहे की, वैवाहिक बलात्काराला आतापर्यंत मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे, जबलपूर पोलीस स्टेशन येथे नोंदविण्यात आलेला गुन्हा क्रमांक 377/2022 मधील एफआयआर आणि अर्जदार (पती) विरुद्धचा फौजदारी खटला रद्द करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
जबलपूर येथील एका व्यक्तीने पत्नीच्या तक्रारीवरून (Relationship) आपल्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. पत्नीने पतीविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता.
यावर न्यायालयाने कायदेशीररित्या विवाहित पत्नीसोबत पतीने अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नसल्याचा निकाल दिला. त्यामुळे सध्या हे प्रकरण चर्चेत आलं आहे.
News Title – High Court decision regarding unnatural relationship after marriage
महत्त्वाच्या बातम्या-
उर्फीला शिव्या घालणाऱ्यांनीही केलं तिचं कौतुक, उर्फीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
पैसे टिकत नाहीयेत?, चाणक्यांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी नक्की करा
नागरिकांनो…घराबाहेर पडू नका; या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा
“मी ब्रेकअप केलंय”, शाहरूखच्या लेकीची पोस्ट व्हायरल; बॉयफ्रेंडच्या आईने केली कमेंट