हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये ‘या’ कलाकारांनी गमावलाय जीव; अपघात इतका भीषण की शरीराचा एक अवयवही..

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Plane crash accident | ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या काल (3 मे) हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये थोडक्यात बचावल्या. सुषमा अंधारे यांचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं. लोकसभा निवडणुकीनिमित्त प्रचारासाठी त्या महाडला गेल्या होत्या.तिथून त्या हेलिकॉप्टरने बारामतीला जाणार होत्या. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मनोरंजन विश्वातील बऱ्याच कलाकारांनी अशा अपघातामध्ये आपला जीव गमावला आहे. यात अनेक दिग्गज कलाकारांची नावे आहेत. हे अपघात इतके भीषण राहिले आहेत की, काही जणांची तर अक्षरशः राख पाहायला मिळाली. त्यांच्या कुटुंबियांना त्यांचा चेहराच काय शरिराचा एकही अवयव पाहायला मिळाला नाही.

हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये झाला ‘या’ कलाकारांचा मृत्यू

अभिनेते इंदर ठाकुर : अभिनेते इंदर ठाकूर ‘नदिया के पार’ या चित्रपटात दिसले होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला खलनायक हिरालाल ठाकूर यांचा धाकटा मुलगा इंदर ठाकुर यांचा जन्म 1950 साली झाला.ते अभ्यासात सुरुवातीपासूनच हुशार होते.अभ्यासासोबतच त्यांना फॅशन डिझायनिंगची आवड होती.

इंदर ठाकुर तरुण वयात खूपच देखणे होते. त्यामुळे त्यांना मॉडेलिंगच्या ऑफर्स सुरू झाल्या. काही दिवसातच त्यांचे नाव देशातील लोकप्रिय मॉडेल्समध्ये सामील झाले.राजश्री प्रॉडक्शन या काळात एक चित्रपट बनवणार होते आणि त्या चित्रपटासाठी ते एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. तेव्हा त्यांची नजर इंदर ठाकुर यांच्यावर पडली. त्यांची 1982 साली आलेला ‘नदिया के पार’ या चित्रपटासाठी निवड झाली.नंतर त्यांचं यश बहरत गेलं. मात्र एक दिवस ती काळी रात्र आली.

1985 साली अमेरिकेत झालेल्या आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनिंग स्पर्धेत इंदर ठाकुर यांनी विजेतेपद पटकावले होते, या पुरस्कारासह ते कॅनडाला गेले होते आणि तेथून भारतात परतत होते. 23 जून 1985 रोजी एअर इंडिया फ्लाइट 182, जी लंडन-दिल्ली होती.याच फ्लाइटमध्ये स्फोट झाला. या अपघातात इंदर ठाकुर (Plane crash accident) यांचा मृत्यू झाला.

विलियम जोसेफ लारा : 1990 मध्ये आलेल्या टार्जन या टेलिव्हिजन सीरिजमधील अभिनेता विलियम जोसेफ लारा यांचंही हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये निधन झालं. या दुर्घटनेत जोसेफ लाराबरोबर त्यांची पत्नी देखील मृत्यूमुखी पडली.

तरुणी सचदेव : एका हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये रसना गर्ल अभिनेत्री तरुणी सचदेव हिने आपला जीव गमावला. वयाच्या 14व्या वर्षी तरुणी सचदेवचा अपघात झाला. तिच्या जन्माची आणि मृत्यूची तारीख ही सेम होती. 14 मे 1998 साली तिचा जन्म झाला. तर 14 मे 2012 साली तिचा मृत्यू झाला.

अभिनेत्री सौंदर्या : अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘सूर्यवंशम’ या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री सौंदर्याचा देखील हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू झाला.सूर्यवंशम सिनेमात तिनं अमिताभ बच्चनच्या पत्नीची भुमिका साकारली होती. त्या राजकारणात देखील सक्रिय होत्या. 2004 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 17 एप्रिल 2004 साली सौंदर्या भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी करीमनगरला जात होत्या.या दरम्यान हेलिकॉप्टर बेंगळुरूमधील जक्कूर एअरफील्डवरून उड्डाण घेतल्यानंतर 100 फुटांवर जाऊन क्रश (Plane crash accident) झालं.यात तिचा मृत्यू झाला.

News Title – Plane crash accident These artists lost their lives

महत्त्वाच्या बातम्या-

उर्फीला शिव्या घालणाऱ्यांनीही केलं तिचं कौतुक, उर्फीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता भाजपचा दरवाजा ठोकून थकला, त्यांची पक्षातून हकालपट्टी करा; या बड्या नेत्याची पवारांकडे मागणी

पैसे टिकत नाहीयेत?, चाणक्यांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी नक्की करा

नागरिकांनो…घराबाहेर पडू नका; या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

“मी ब्रेकअप केलंय”, शाहरूखच्या लेकीची पोस्ट व्हायरल; बॉयफ्रेंडच्या आईने केली कमेंट