मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, वाचा हवामान खात्याचा अंदाज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | राज्यामध्ये उन्हाळ्यात अवकाळी पावसाचं थैमान आहे. त्यासोबतच उष्मघाताने देखील अनेक नागरिक दगावले आहेत. त्याचसोबत आता मुंबई समुद्र किनारपट्टी परिसरात हवामान विभागाने मोठ्या लाटांची शक्यता वर्तवली आहे. 4 मे 2024 रोजी सकाळी 11.30 वाजल्यापासून ते रविवार दिनांक 5 मे 2024 रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत 36 तासांच्या कालावधीत समुद्रात भरतीच्या लाटांची शक्यता आहे, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. (Mumbai Weather Update)

समुद्राच्या लाटांच्या उंचीत वाढ

समुद्राच्या 0.5 मीटर ते 1.5 मीटर उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. समुद्र किनारपट्टी परिसरामध्ये सखोल भागात याचा परिणाम होणार असल्याची शक्यता आहे. यामुळे आता हवामान अभ्यासकांनी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना, मासेमाऱ्यांना समुद्र किनारपट्टीकडे न जाण्याचं आवाहन केलं आहे. (Mumbai Weather Update)

हवामान खात्याने उंच लाटांबाबत अंदाज वर्तवल्याने समुद्र किनारपट्टी परिसरात याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यासाठी आता महानगरपालिकेनं एक मोठं पाऊल उचललं आहे. समुद्र किनारपट्टीलगत मासेमारी करण्यासाठी कोणीही जावू नये, असं आवाहन महानगरपालिकेनं केलं असून सुरक्षारक्षक आणि जीव रक्षकांच्या मदतीने महापालिकेनं समुद्र किनारपट्टीलगत जाण्यास मज्जाव करण्याचे निर्देश दिले आहेत.

उन्हाळ्यामध्ये अनेकजण पर्यटक समुद्राचा मनमुरादपणे आनंद लुटायला येत असतात. कोणी सेल्फी काढण्यात गुंग असतं तर कोणी समुद्राच्या पाण्यासोबत खेळताना दिसतं. मात्र सध्या मुंबईच्या समुद्राच्या लाटांबाबत हवामान अभ्यासकांनी धोक्याची घंटा वर्तवली आहे. ही बाब लक्षात घेऊनच पर्यटकांनी आपली स्वत:ची दक्षता घ्यावी. (Mumbai Weather Update)

मासेमाऱ्यांना विशेष सूचना

मासेमाऱ्यांनी आपल्या बोटी सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. अनेकदा मासेमारी करणारे बांधव आपल्या बोटी समुद्रकिनारी ठेवतात. मात्र सध्या परिस्थिती पाहता. मोठ्या लाटांचा अंदाज आहे. यामुळे या लाटांमुळे बोटी एकमेकांवर आदळून नुकसान होऊ शकतं. (Mumbai Weather Update)

मुंबई पोलीस, अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका लक्ष ठेऊन आहेत. पर्यटक आणि किनारपट्टीवर वास्तव्यास असलेल्या सर्व नागरिकांनी समुद्रामध्ये जाऊ नये, आपली काळजी घ्यावी, असं आवाहन आता बृहन्मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे.

News Title – Mumbai Weather Update Sea High Tide

महत्त्वाच्या बातम्या

उर्फीला शिव्या घालणाऱ्यांनीही केलं तिचं कौतुक, उर्फीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता भाजपचा दरवाजा ठोकून थकला, त्यांची पक्षातून हकालपट्टी करा; या बड्या नेत्याची पवारांकडे मागणी

पैसे टिकत नाहीयेत?, चाणक्यांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी नक्की करा

नागरिकांनो…घराबाहेर पडू नका; या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

“मी ब्रेकअप केलंय”, शाहरूखच्या लेकीची पोस्ट व्हायरल; बॉयफ्रेंडच्या आईने केली कमेंट