TMKOC मधील सोढीबाबत मोठी अपडेट समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gurucharan Singh | सोनी सबवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील रोशन सिंग सोढी ही भूमिका साकारत ज्या अभिनेत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं तो बेपत्ता होऊन आता 10 दिवस उलटले आहेत. पोलिसांकडून त्याचा अजूनही शोध सुरू आहे.

आता सोढीबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सोढीने बेपत्ता होण्याचा प्लान स्वतःच तयार केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. गुरुचरण सिंहचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी विविध तपास पथके नियुक्त केली आहेत. त्यातील एक पथक मुंबईत दाखल झाले असून त्यांनी गुरुचरण सिंह याच्याबाबत कलाकारांकडे चौकशी केल्याची माहिती आहे.

अभिनेता 22 एप्रिलपासून दिल्ली विमानतळ परिसरातून बेपत्ता झाला आहे. त्याने आपला मोबाईल फोन हा पालम परिसरात सोडला असल्याची माहिती मिळत आहे. सीसीटीव्ही फूटेजनुसार, गुरुचरण सिंह एका ई-रिक्षातून दुसऱ्या रिक्षात बसताना दिसला असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे आता ही घटना षड्यंत्र आहे की घातपात?, असा प्रश्न केला जातोय.

सोढी शेवटचा कधी दिसला?

22 एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी गुरुचरण सिंग घरातून निघाला होता. मात्र, तो मुंबईला पोहोचलाच नाही.तसंच दिल्लीतील आपल्या घरीदेखील तो आला नाही. विमानतळावर अधिक माहिती घेतली असता गुरुचरण सिंह विमानात बसलाच नसल्याची माहिती समोर आली होती. गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) हा मानसिकदृष्ट्या स्थिर असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.

TMKOC मधील भूमिकेने दिली ओळख

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये गुरुचरण सिंह यांने रोशन सिंग सोढीची भूमिका साकारली होती. याच भूमिकेमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. मात्र, मालिकेत काम केल्यानंतर मानधन उशिराने मिळत असल्यामुळे गुरुचरण सिंग याने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.

एका मुलाखतीत खुद्द अभिनेत्याने (Gurucharan Singh)  मालिका सोडण्याचं कारण सांगितलं होतं. त्या सुमारास त्याच्या वडिलांची शस्त्रक्रिया झाली होती आणि त्याशिवाय, खासगी आयुष्यातही काही गोष्टींची काळजी घ्यावी लागत होती. असं गुरुचरण सिंग याने सांगितलं होतं.गुरुचरण सिंह यांने 2020 मध्ये हा शो सोडला.

News Title –  Gurucharan Singh Aka Roshan Singh Sodhi missing update