श्रीरंग बारणेंना निवडून आणण्यासाठी भाजप करतंय जिवाचं रान, ‘हा’ आहे खास प्लॅन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pimpri Chinchwad | मावळ लोकसभेची निवडणूक आता ऐन रंगात आली आहे. प्रचारासाठी आता अवघे काही दिवस हातात राहिले आहेत. अशात महायुती आणि महाविकासआघाडी या दोन्ही आघाड्यांकडून आपापल्या उमेदवारासाठी उन्हातान्हाचा विचार न करता जोरदार प्रचार सुरु आहे. शिवसेना – भाजपा – राष्ट्रवादी – आरपीआय आणि मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे (Shrirang Appa Barne)  हे हॅटट्रीक साठी पुन्हा एकदा लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. परंतू यंदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यापूर्वीच म्हणजेच उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आप्पा बारणे यांनी अर्धी लढाई जिंकली आहे. याचे कारण टोकाचे विरोध करणारे मित्र पक्षांच सर्व नेते आता त्यांच्या प्रचारात आघाडीवर उतरले आहेत. त्यातही मावळ लोकसभेतील सहाही विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार बारणेंसोबत आहेत. त्यामुळे बारणेंसाठी ही लढाई अधिक सोपी झाली आहे. त्यातही श्रीरंग बारणे (Shrirang Appa Barne)  यांचा विजय अधिक सोपा करण्यासाठी आता स्वतः शंकर जगताप हेच मैदानात उतरल्याचं दिसत आहे.

2014 साली श्रीरंग बारणे (Shrirang Appa Barne)  यांनी शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा मावळ लोकसभेची निवडणूक लढवली. यावेळी श्रीरंग बारणे यांना शेतकरी कामगार पक्ष आणि मनसेचा पाठींबा असलेल्या लक्ष्मण जगताप यांनी कडवी झुंज दिली होती. या निवडणूकीत विजय मिळवून बारणे पहिल्यांदा खासदार झाले. परंतू, लक्ष्मण जगताप यांनी तेव्हा बारणेंना दिलेली लढत आजही सर्वांच्या स्मरणात आहेत. बारणे हे मुळ चिंचवड येथील आहेत. ते चिंचवडमधून दोन वेळा मावळचे खासदार झाले. तर लक्ष्मण जगताप हे देखील चिंचवड मधीलच रहिवासी आणि 2024 साली मावळ लोकसभेत पराभव झाल्यानंतर ते 2014 आणि 2019 साली चिंचवड विधानसभेचे सलग आमदार राहिले. निवडणूकीनंतर मात्र बारणे आणि जगताप यांच्यात नेहमी सलोखा आणि सुसंवाद राहिला. गेल्यावर्षी लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आश्विनी जगताप चिंचवड  विधानसभेच्या आमदार झाल्या. यावेळी त्यांचे बंधू शंकर जगताप हेही इच्छुक होते. परंतू त्यांना संधी मिळाली नाही, मात्र ते सध्या भाजपाचे शहराध्यक्ष आहेत. त्यामुळे श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा निवडणूकीत उतरल्यानंतर आता स्व. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकरराव जगताप हेच बारणेंच्या विजयासाठी कंबर कसून मैदानात उतरल्याचे दिसत आहे. यापाठी युती धर्म तर आहेच परंतू बारणेंसोबत असलेला सलोखाही महत्वाचा ठरत आहे.

श्रीरंग बारणेंसाठी शंकर जगताप घेतायेत 100 ‘नमो संवाद सभा’

मावळ लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधासभा मतदारसंघात चिंचवड (Pimpri Chinchwad) विधानसभेतील मतदारांची संख्या ही सर्वाधिक आणि निर्णायक असणार आहे. यापुर्वीच्या सर्व निवडणूकांमधून ही गोष्ट दिसून आली आहे. मावळातील एकूण 25 लाख मतदारांपैकी एकट्या चिंचवड विधानसभेत 5 लाख 995 हजार मतदार आहेत. त्यामुळे या ठिकाणी जर बारणेंनी आघाडी घेतली तर त्यांच्या विजयाचा मार्ग सोप्पा असणार हे पक्के आहे. आणि त्यांचा हा विजय सोप्पा करण्यासाठी शंकर जगताप हे चिंचवड शहराचा कोपरा आणि कोपरा पिंजून काढत आहेत. त्यासाठी त्यांनी ‘नमो संवाद सभा’ घेण्यास सुरुवात केली आहे.

चिंचवड शहरात असणाऱ्या सर्व उपनगरांतील सर्व सोसायट्यांमध्ये शंकर जगताप हे दिवसरात्र संवाद साधत आहे. सकाळपासून ते रात्री उशीरापर्यंत त्यांच्याककडून ‘नमो संवाद सभा’ घेतल्या जात आहेत. एका एका उपनगराचे फुल बारणेंच्या विजय माळेत गुंफण्यासाठी हा खास प्लॅन शंकर जगताप राबवत आहेत. त्यात आमदार अश्विनी जगताप आणि महायुतीच्या अन्य पदाधिकाऱी यांचीही मोलाची साथ त्यांना लाभत आहे.

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपा करतंय जीवाचं रान –

केंद्रातील मोदी सरकार आपल्या तिसऱ्या टर्मसाठी यावेळी जनतेसमोर मतांचा जोगवा मागत आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे अशी तळागाळातील भाजपा कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे. त्यासाठीच भाजपाचे आणि सोबतच एनडीएचे सर्वात जास्त खासदार यावे यासाठी भाजपा जोरदार प्रचार करत आहे.

‘अबकी बार 400 पार’ हा तर भाजपचा प्रचाराचा नारा आहे. त्यामुळे सुरुवातीला भाजपाने मावळ लोकसभा मतदारसंघ हा देखील सेफ राहावा यासाठी तो भाजपच्या वाट्याला यावा यासाठी प्रयत्न केले. परंतू महायुतीच्या जागावाटपात ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आली. त्यासह श्रीरंग बारणे हे मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये तिसऱ्या टर्मचे खासदार म्हणून जाण्यासाठी रणांगणात उमेदवार म्हणून उभे ठाकलेत. अशात भाजपा कार्यकर्ते हे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमध्ये मावळचाही खासदार पाठींबा देणाराच असावा यासाठी युतीचा धर्म पाळून श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात जिवाचे रान करताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

उर्फीला शिव्या घालणाऱ्यांनीही केलं तिचं कौतुक, उर्फीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता भाजपचा दरवाजा ठोकून थकला, त्यांची पक्षातून हकालपट्टी करा; या बड्या नेत्याची पवारांकडे मागणी

पैसे टिकत नाहीयेत?, चाणक्यांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी नक्की करा

नागरिकांनो…घराबाहेर पडू नका; या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

“मी ब्रेकअप केलंय”, शाहरूखच्या लेकीची पोस्ट व्हायरल; बॉयफ्रेंडच्या आईने केली कमेंट