Urfi Javed | अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या कपड्यांमुळे घेऊन नेहमी चर्चेत असते. पापराझी तिचे फोटो घेण्यासाठी नेहमी आतुर असतात. अनेकदा नेटकरी उर्फीला तिच्या अंगप्रदर्शनावरून तिला कमेंट्स करत डिवचत असतात.
उर्फीच्या ड्रेसची चर्चा
उर्फीने (Urfi Javed) आता तोकडे कपडे न घालता थेट काळ्या रंगाचा संपूर्ण शरीर झाकलेला गाऊन घातला आहे. त्या ड्रेसवर पिवळ्या रंगाची फुले देखील दिसत आहेत. उर्फीचा असा पेहराव पाहून नेटकरी आणि पापराझींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिची तुलना ही आता बॉलिवूडचे फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राशी केली आहे.
पापाराझी फोटो आणि व्हिडीओ शूट करण्यासाठी आले तेव्हा उर्फीने (Urfi Javed) एक जादू दाखवली आहे. तिने टाळ्या वाजवताच तिच्या ड्रेसवरील पाना-फुलांच्या डिझायनमधून कागदी फुलपाखरू उडून खाली पडले. उर्फीचा हा जादूई ड्रेस नेटकरी आणि चाहत्यांना प्रचंड आवडला. उर्फीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
उर्फीने पहिल्यांदाच अंग झाकून घातलेल्या ड्रेसची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. उर्फीने घातलेल्या या ड्रेसचे आणि उर्फीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहेत. काही नेटकऱ्यांनी उर्फीच्या ड्रेसवर आपल्या प्रतिक्रिया दिल्यात.
View this post on Instagram
उर्फीचं नेटकऱ्यांकडून कौतुक
उर्फीच्या परिधान केलेल्या गाऊनवर नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. ‘काही म्हणा पण ही मुलगी मेहनत करते’, असं एकाने कमेंट करत तिचं कौतुक केलंय. तर एकाने ‘पहिल्यांदाच उर्फीने सुंदर ड्रेस परिधान केलाय’, ‘जेव्हा इंजीनिअर आणि फॅशन डिझाइनर यांची भेट होते..’, अशाही प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
उर्फीच्या (Urfi Javed) फॅशन्स सेन्सवरून अनेकदा उर्फीला ट्रोल केलं गेलं होतं. तर तिला तिच्या कपड्यांवरून नेटकऱ्यांनी अनेकदा सोशल मीडियावर झापलं देखील आहे. मात्र उर्फी पहिल्यांदा पूर्ण कपड्यात दिसल्याने सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे, असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही.
News Title – Urfi Javad Dress Everyone Impress
महत्त्वाच्या बातम्या
महायुतीला पाठिंबा जाहीर करताच अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यावरील जप्ती मागे
सलमानने ऐश्वर्या नाही तर ‘या’ मुलीला घातलेली लग्नाची मागणी!
चित्रा वाघ नव्या संकटात, ‘त्या’ अभिनेत्याने समोर येऊन केली मोठी मागणी
स्वप्नांचा चक्काचूर; T20 World Cup मध्ये ‘या’ खेळाडूला डच्चू, वडिलांनी व्यक्त केली नाराजी