प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कँडल प्रकरणी धक्कादायक खुलासा समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Prajwal revanna | देशामध्ये सेक्स स्कँडलप्रकरणी नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. देशाचे माजी पंतप्रधान यांचे नातू प्रज्वल रेवन्ना यांचे कथित सेक्स व्हिडीओवरून देशाच्या राजकारणात वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान आता कर्नाटकचे माजी मंत्री एच.डी. रेवन्ना यांच्याविरोधात अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आला आहे. तर आता एच.डी. रेवन्ना यांच्या सहकार्यांनी माझ्या आईचं अपहरण केलं असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. (Prajwal revanna Sex Scandal)

एचडी रेवन्ना यांच्या फार्महाऊसवर एचडी राजू आणि त्याची आई काम करायची. एचडी रेवन्ना यांचा मुलगा प्रज्वल रेवन्नाच्या कथित सेक्स टेपमध्ये जी पीडित महिला दिसत आहे ती राजूची आई आहे. पोलिसांनी सतिश बाबान्ना आणि एचडी रेवन्ना यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यांच्या घरी दुसऱ्या महिलेच्या तक्रारीवरून एचडी रेवन्ना आणि प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक छळाची तक्रार करण्यात आली. (Prajwal revanna Sex Scandal)

“29 एप्रिलपासून माझी आई बेपत्ता आहे. तिच्या लैंगिक छळाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत” असा आरोप राजू एचडीने केलाय. सतीशने 26 एप्रिलला आईला घरी आणून सोडल्याचा दावा राजूने केला आहे.

तक्रारीत राजूने काय म्हटलं?

“मी आणि माझी आई रेवन्नाच्या घरी आणि फार्महाऊसवर गेली सहा वर्षे काम करत होतो. आईने काम सोडून दिलं होतं. 26 एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. त्याच्या तीन ते चार दिवस सतीश नावाचा इसम हा आमच्या घरी आला. रेवन्नाची पत्नी भावनीने कामानिमित्त बोलावलं असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याने 26 एप्रिल रोजी पुन्हा घरी आणून सोडलं. पोलीस घरी येऊ शकतात असं त्यांनी मला आणि आईला गायब होण्याबाबत सांगितलं,” असा दावा राजूने केला आहे. (Prajwal revanna Sex Scandal)

“26 तारखेला घरी सोडल्यानंतर पुन्हा एकदा सतीश तीन दिवसांनी म्हणजे 29 एप्रिल रोजी आला होता. तो जबरदस्ती आईला घेऊ गेला. जर आई सापडली तर आम्हाला तुरूंगात जावं लागेल, असं सतीश म्हणाला असल्याचं राजूने तक्रारीत नमूद केलं. तसेच 1 मे दिवशी मला मित्रांकडून कळालं की त्या व्हिडीओमध्ये माझी आई आहे” असं राजू म्हणाला. (Prajwal revanna Sex Scandal)

प्रज्वल रेवन्ना जीडीएस पक्षातून निलंबित

दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी जीडीएस नेते प्रज्वल रेवन्ना हे कथित सेक्स व्हिडीओ प्रकरणी अडचणीत आला. एवढंच नाहीतर तो जीडीएस पक्षात होता त्या पक्षाने त्याला निलंबित केलं.

News Title – Prajwal Revanna Sex Scandal New Twist

महत्त्वाच्या बातम्या

‘या’ भागांमध्ये येणार उष्णतेची लाट; हवामान खात्याचा इशारा

‘तू येच तुला आडवा करतो’; अरे शुभ बोल नाऱ्या…उद्धव ठाकरे भडकले

TMKOC मधील सोढीबाबत मोठी अपडेट समोर!

बारणेंना निवडणून आणण्यासाठी भाजप करतंय जिवाचं रान, ‘हा’ आहे खास प्लॅन

उर्फीला शिव्या घालणाऱ्यांनीही केलं तिचं कौतुक, उर्फीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल