“बहिणीने भावाच्या घरी जास्त दिवस थांबू नये”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mahadev Jankar | बारामतीमध्ये लोकसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली आहे.येथे पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना होणार आहे. राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. अजित दादा आता महायुतीचा भाग आहे.

त्यातच बारामतीमध्ये येथे अजित पवारांनी थेट सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवार उभा केलाय. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे असा हा संघर्ष होणार आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून सध्या बारामतीत जोरदार प्रचार केला जातोय.

महादेव जानकरांचा सुप्रिया सुळे यांना टोला

सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी भाजप नेतेही मैदानात उतरले आहेत. अशात राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधत त्यांना खोचक सल्ला दिला आहे. ते महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ बारामतीमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी शरद पवार गटावर टीका केली.

“सुप्रिया ताईंना मी सांगेन की, बहिणीने भावाच्या घरी अधिक दिवस राहू नये. बहिणीने तीच्या घरी जावं, देशाच एनडीएचं सरकार बनत आहे, बारामतीचा खासदार हा सरकारला समर्थन करणारा बनावा म्हणून सांगायला आलोय.”, असं म्हणत महादेव जानकरांनी (Mahadev Jankar) टोला लगावला.

बारामतीत सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार

यावेळी त्यांनी धनगर आरक्षणाबाबतही भूमिका मांडली.मी मंत्री होतो तेंव्हा 22 योजना धनगर समाजासाठी सुरू केल्या.ओबीसींना घटनात्मक दर्जा देण्याचं काम मोदी सरकारने केलं. धनगर समाजासाठी आम्ही सक्षम आहोत, असं महादेव जानकर (Mahadev Jankar) म्हणाले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.अशात महायुतीत यशस्वी मध्यस्थी झाल्याने परभणीची जागा रासपसाठी सोडण्यात आली. जानकर आता परभणीतून लोकसभेसाठी उभे राहिले आहेत.सध्या ते बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी आले आहेत.यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टोलेबाजी केली.

News Title –  Mahadev Jankar criticism of Supriya Sule

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ भागांमध्ये येणार उष्णतेची लाट; हवामान खात्याचा इशारा

‘तू येच तुला आडवा करतो’; अरे शुभ बोल नाऱ्या…उद्धव ठाकरे भडकले

TMKOC मधील सोढीबाबत मोठी अपडेट समोर!

बारणेंना निवडणून आणण्यासाठी भाजप करतंय जिवाचं रान, ‘हा’ आहे खास प्लॅन

उर्फीला शिव्या घालणाऱ्यांनीही केलं तिचं कौतुक, उर्फीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल