पुणे शहरातील पूर नियंत्रणासाठी मुरलीधर मोहोळ यांची मोठी योजना

Maharashtra CM

Murlidhar Mohol | कमी वेळेत अधिक पाऊस होऊन शहरात निर्माण होणारी पूरस्थिती रोखण्यासाठी शहरी पूर नियंत्रण आराखडा राबविणार असल्याचे आश्वासन पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी दिले.

दत्तवाडी, राजेंद्र नगर, सेनादत्त पोलीस चौकी, नवी पेठ, टिळक रस्ता, रामबाग कॉलनी, साने गुरुजी नगर, पर्वती गाव, लक्ष्मीनगर, सातारा रस्ता परिसरात मोहोळ यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. शहराध्यक्ष धीरज घाटे, हेमंत रासने, सरस्वती शेंडगे, राजेंद्र काकडे, अमित कंक, प्रशांत सुर्वे, प्रणव गंजीवाले, चंद्रकांत पोटे, संजय देशमुख, छगन बुलाखे, उमेश दुरंडे, राजू परदेशी, उमेश चव्हाण, राजाभाऊ भिलारे, गणेश भोकरे, नीलेश हांडे, हेमंत जगताप, रवी साने, कपिल जगताप, नीलेश धुमाळ उपस्थित होते.

पूर नियंत्रणासाठी मोहोळांची मोठी योजना

केंद्राच्या शहरी पूर नियंत्रण योजनेत पुणे, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळूर, हैदराबाद आणि अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे. मी महापौर असताना पुणे महापालिकेने या संदर्भातला आराखडा केंद्र सरकारकडे सुपूर्द केला होता. त्या आराखड्याला मान्यता मिळाली असून शहराच्या विविध भागांमध्ये 250 कोटी रुपयांची पूरनियंत्रणासाठी कामे होणार आहेत, असं मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) म्हणाले.

या उपाययोजना करणार

पूराच्या पाण्याच्या अंदाज घेण्यासाठी सेन्सर्स बसवणे, धोकादायक ठिकाणी कॅमेरे बसवणे, पाणी टेकड्यांवर जिरवण्यासाठी उपाय करणे, कल्व्हर्ट बांधणे, नाल्यांचे ड्रोन मॅपिंग करणे, गटारांची क्षमता वाढवणे, सांडपाणी व्यवस्थापन करणे, गॅबियन वॉल उभारणे, कमांड कंट्रोल रूम उभारणे अशा प्रकारची कामे केली जाणार आहेत. पाच वर्षांपूवी आंबील ओढ्याला आलेल्या पुरात नुकसान झालेल्या सोसायट्या आणि नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत, असं मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“बहिणीने भावाच्या घरी जास्त दिवस थांबू नये”

प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कँडल प्रकरणी धक्कादायक खुलासा समोर!

“हार्दिकच्या नेतृत्वात प्रचंड अडचणी..”; ‘या’ दिग्गज खेळाडूचा पांड्याबाबत खळबळजनक दावा

अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या नवऱ्याला झालाय ‘हा’ गंभीर आजार; प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, वाचा हवामान खात्याचा अंदाज

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .