“कोल्हापूरमध्ये मर्दांची कमी आहे काय?, कशाला हवं टेस्ट ट्यूब बेबी?”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या रोखठोक वक्तव्यामुळे ओळखले जातात. आता त्यांचं नुकतंच एक विधान चर्चेत आलं आहे. कोल्हापुरात एका आयव्हीएफ सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.

कोल्हापूरमध्ये काय मर्द लोकांची कमी आहे का? कशाला टेस्ट ट्यूब बेबी पाहिजे…, असा सवाल नितीन गडकरी यांनी केला. यानंतर एकच हशा पिकला. तसेच कोल्हापूरहून बरेच लोक अमेरिकेत गेले आहेत. सांगली, सातारा आणि कोल्हापुरातून लोक अमेरिकेत गेले आहेत. त्यांना सांगा, जागा घ्या आणि कोल्हापुरात आयटीपार्क बांधा, असा सल्लाही नितीन गडकरी यांनी यावेळी दिला.

नितीन गडकरी यांचं मोठं वक्तव्य

यासोबतच त्यांनी कोल्हापूरच्या क्षमतांबद्दलही बोलून दाखवलं. अ‍ॅटोमोबाईल क्षेत्रातील मोठे हब बनण्याची कोल्हापूरची क्षमता असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक, कोल्हापुरातील उद्योजक, व्यावसायिक, वकील, सीए, उपस्थित होते.

कोल्हापूर हे साखर कारखान्याचे माहेरघर असून आता आपण इथेनॉल उद्योग 2 लाख कोटी रूपयांचा करणार आहोत. त्यामध्ये या कारखान्यांनी भरीव योगदान दिल्यास त्याचा शेतकऱ्यांनाही फायदा होईल, असं गडकरी (Nitin Gadkari ) यांनी म्हटलं.

कोल्हापूरकरांच्या क्षमतेबद्दल गडकरींचं मोठं वक्तव्य

पुढे त्यांनी म्हटलं की, हुपरीच्या चांदी उद्योगासाठी सिल्वर डिझाईन इन्स्टिट्यूट, टेक्टाईल डिझाईन इन्स्टिट्यूट सुरू करण्याची गरज असून अ‍ॅटोमोबाईल क्षेत्रातील मोठे हब बनण्याची कोल्हापूरची क्षमता आहे.

यासोबतच गडकरी यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात कोणते बदल झाले याचीही उजळणी केली. मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दळणवळणाबाबत अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने देशभरात प्रचंड कामे करता आली. त्यातून भारत आता अ‍ॅटोमोबाईल क्षेत्रात जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला असल्याचं गडकरी (Nitin Gadkari ) यांनी म्हटलं.

News Title :  Nitin Gadkari Big Statement

महत्त्वाच्या बातम्या –

“हार्दिकच्या नेतृत्वात प्रचंड अडचणी..”; ‘या’ दिग्गज खेळाडूचा पांड्याबाबत खळबळजनक दावा

अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या नवऱ्याला झालाय ‘हा’ गंभीर आजार; प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, वाचा हवामान खात्याचा अंदाज

हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये ‘या’ कलाकारांनी गमावलाय जीव; अपघात इतका भीषण की शरीराचा एक अवयवही..

..अन् थोडक्यात अनर्थ टळला! भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग