सूरत, इंदौरनंतर ‘या’ मतदारसंघात चक्र फिरली!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Congress | लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अनेक धक्कादायक घटना घडताना दिसत आहेत. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षातून (Congress) दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गुजरातमधील सूरत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) उमेदावारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीचा भाजपचा सूरत लोकसभा मतदारसंघात पहिला बिनविरोध विजय झाला. त्यानंतर आता इंदौर आणि ओडिसामध्ये देखील असाच प्रकार घडला आहे.

इंदौरमध्ये काँग्रेस (Congress) नेत्याला भाजपने आपल्याकडे वळवलं. त्यामुळे इंदौरच्या मतदारसंघात प्रतिस्पर्धी उरला नाही. यामुळे इंदौरमधील काँग्रेस नेते भाजपवर आणि उमेदवारावर संतापले होते. त्यानंतर अशीच काहीशी परिस्थिती ही ओडिसाच्या पुरीमधील आहे. काँग्रेस (Congress) उमेदवार सुचारिता मोहंती यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. पक्षाकडून कोणतीही आर्थिक मदत झाली नसल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतलीये.

काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना सुचारिताने पत्र लिहिलं. यामध्ये आपण उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचं त्या पत्रात नमूद केलं. पार्टीने पुरेसा आर्थिक निधी न दिल्याने म्हणावा असा प्रचार करता येत नाहीये. “मी याबद्दल जेव्हा, ओडिसा काँग्रेसचे प्रभारी डॉ. अजॉय कुमार यांना सांगितलं, तेव्हा तुम्ही तुमच्या फंडाची व्यवस्था करा असं त्यांनी सांगितलं.

“मी पगार घेणारी पत्रकार पण राजकारणात…”

“मी पगार घेणारी पत्रकार होती. 10 वर्षांआधी मी राजकारणात प्रवेश केला होता. प्रगतशील राजकारणासाठी मी डोनेशन ड्राईव्ह देखील चालवलं आहे. पण मला त्यात म्हणावं असं यश मिळवता आलं नाही. मी निवडणूक खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही झालं नाही,” असं सुचारिता म्हणाल्या आहेत.

“लोकसभा निवडणुकीसाठी मी आपल्या जबाबदारीवर पैसे जमवू शकत नाही. मोठी रक्कम जमा करणं अवघड आहे. म्हणून मी आता केंद्राच्या काँग्रेस पक्षाकडे मदत मागितली. पुरीमध्ये निवडणूक प्रचारासाठी पुरेसा निधी देण्यासाठी विनंती केली. पण मला काही सहकार्य मिळाले नाही. केवळ आर्थिक कमतरतेमुळे पुरीमधला विजय रथ रोखला जाऊ शकतो” असं सुचारिता म्हणाल्यात.

याआधी सूरत आणि इंदौरमध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळत होती. सूरतमध्ये काँग्रेस उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे सूरत येथे भाजपचा विनविरोध विजय झाला. तर इंदौर येथे काँग्रेसच्या लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार याने देखील भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ओडिसातील पुरी येथे काँग्रेस उमेदवाराला प्रचार करण्यााठी पूर्ण अर्थसहायता होत नसल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.

News Title – Congress Party Puri Candidate Sucharita Mohanty Refused To Contest Lok Sabha Election

महत्त्वाच्या बातम्या

नागरिकांनो…घराबाहेर पडू नका; या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

“मी ब्रेकअप केलंय”, शाहरूखच्या लेकीची पोस्ट व्हायरल; बॉयफ्रेंडच्या आईने केली कमेंट

महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी ‘इतक्या’ जागांवर विजय मिळणार? शरद पवारांनी थेट आकडाच सांगितला

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय

अभिजीत बिचुकले ‘या’ बड्या नेत्याला देणार टक्कर; ‘या’ मतदार संघातून भरला अर्ज