“मोदींनी फोन लावला आणि युक्रेनचं युद्ध थांबलं, हे येड्या गबाळ्याचं काम नाही”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कामाचं कौतुक करताना रशिया-युक्रेन यांचे युद्धही मोदींनी थांबवल्याचं म्हटलं. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी साताऱ्यात झालेल्या महायुतीच्या सभेत अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मोदींचं तोंडभरून कौतुक केलंय.

“युक्रेनच युद्ध थांबवण्यासाठी मोदींनी फोन लावला”

मोदी हे धडाकेबाज नेते आहेत. युक्रेनच युद्ध थांबवण्यासाठी मोदींनी पुतीनना फोन लावला. माझी माणसं तिथं आहेत असं सांगितलं आणि युद्ध थांबलं. स्पेशल विमानाने लोक भारतात आली. हे कुण्या येड्या गाबाळ्याचं काम नाही असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रचारसभेत बोलताना म्हटलं.

“देशात अनेक पंतप्रधान झाले पण…”

देशात अनेक पंतप्रधान होवुन गेले. राजीव गांधींच्यावर बोफोर्सचा आरोप झाला. त्यांनी मला तकीट दिलं होतं लोकसभेचं. त्या आधी मिस्टर क्लिन अशी छबी होती. पण मनमोहनसिंग यांच्यावर 2 जी चा घोटाळा झाला. कोळसा घोटाळा झाला यावर म्हणणं मांडाव लागलं होतं, असं पवारांनी (Ajit Pawar) सांगितलं.

2019 ला साहेबांनी उद्धव ठाकरें बरोबर जायचं सांगितलं होतं. मी खुपच चांगला आहे हे उद्धव ठाकरेंना उशीरा कळालं होतं. मात्र आधी कळालं असतं तर आपण कधीच कुठं गेलं असतो असं मी म्हटलं. शरद पवारांचा फोटो पोस्टरवर वापरता येत नसल्याचं सांगताना अजित पवार म्हणाले की, शरद पवार आपलं दैवत आहे मात्र कोर्टानं सांगितल्यानंतर चव्हाण साहेबांचा फोटो वापरतो, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

यशवंतराव चव्हाण किती कर्तबगार नेते हे सर्वांना माहित आहे. चव्हाण साहेबांवर सुद्धा राजकीय संकट आली. मात्र लोकांची कामं करायची असतील तर सत्तेत गेलं पाहिजे हे त्यांनीच सांगितलय. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे ही आमची मागणी असल्याचंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

तुम्ही या आधी घड्याळाचा खासदार निवडुन दिला मात्रा यावेळी कमळ चिन्ह निवडुन द्यायचं आहे. नितीन काकांना मी जुन मध्ये खासदार करणार आहे, असं अजित पवार म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

सूरत, इंदौरनंतर ‘या’ मतदारसंघात चक्र फिरली!

“कोल्हापूरमध्ये मर्दांची कमी आहे काय?, कशाला हवं टेस्ट ट्यूब बेबी?”

पुणे शहरातील पूर नियंत्रणासाठी मुरलीधर मोहोळ यांची मोठी योजना

“बहिणीने भावाच्या घरी जास्त दिवस थांबू नये”

प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कँडल प्रकरणी धक्कादायक खुलासा समोर!