उन्हाळ्यात लहान बाळांना घामोळ्याचा त्रास होतोय?; ‘हे’ उपाय करून बघा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Heat Rash In Babies | उन्हाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडते, लाल होते किंवा बऱ्याच जणांना घामोळ्या देखील होतात. लहान लेकरांमध्ये तर ही समस्या खूप साधारण आहे. या घामोळ्यामुळे बाळ सतत रडते, त्याला याचा खूप त्रास होतो.अशात आपल्या बाळाची कशी काळजी घ्यावी, त्यांना घामोळ्यापासून कसा आराम मिळेल?, या प्रश्नाचे उत्तर या लेखात दिले आहे.

त्वचेच्या समस्या झाल्या की त्या लहान मुलांना त्रास देऊ लागतात.यामुळे पालकांची चिंता थोडी अधिकच वाढते. उन्हाळ्यात घामोळ्या का येतात आणि त्या टाळण्यासाठी काय उपाय आहेत, ते जाणून घेऊया.

घामोळ्या येण्याची कारणे

नवजात बाळाच्या त्वचेवर घामोळ्या वातावरणातील अति उष्णतेमुळे किंवा आर्द्रतेमुळे येऊ शकतात.
बाळाच्या त्वचेवर जास्त प्रमाणात क्रीम किंवा तेल लावल्याने घामोळ्या येतात.
मुलांना खूप गडद आणि दाट कपडे घातल्याने त्यांचा घाम बाहेर निघू शकत नाही. यामुळेही घामोळ्या येऊ शकतात.
आवश्यकतेपेक्षा जास्त कपडे परिधान केल्याने बाळाला घामोळ्या (Heat Rash In Babies) येण्याचा धोका देखील वाढतो.

घामोळ्या येऊ नयेत यासाठी टिप्स

बाळ ज्या खोलीत झोपले आहे, त्या खोलीचे वातावरण सामान्य ठेवा.
बाळाला आवश्यकतेपेक्षा जास्त कपडे घालू नका.
उन्हाळ्यात बाळाला काही काळ कपड्यांशिवाय ठेवा.
स्पर्श केल्यावर त्वचेला उष्ण वाटत असल्यास, ती थंड करण्यासाठी तुम्ही थंड पाण्याने बाळाचे शरीर पुसून काढू शकता.
हा त्रास अधिक वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला (Heat Rash In Babies) घेऊन तुम्ही रॅशेस क्रीम वापरू शकता.
बाळाला घट्ट कपडे घालणे टाळा.

बाळामध्ये उष्माघाताची लक्षणे कशी ओळखाल?

शरीरावर पुरळ किंवा घामोळ्या येणे
बाळाच्या त्वचेला स्पर्श केल्यावर गरम वाटणे.
त्वचेवर लालसरपणा दिसून येणे
त्वचेवर खाज सुटणे

News Title – Heat Rash In Babies tips for skin care  

महत्त्वाच्या बातम्या-

प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कँडल प्रकरणी धक्कादायक खुलासा समोर!

“हार्दिकच्या नेतृत्वात प्रचंड अडचणी..”; ‘या’ दिग्गज खेळाडूचा पांड्याबाबत खळबळजनक दावा

अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या नवऱ्याला झालाय ‘हा’ गंभीर आजार; प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, वाचा हवामान खात्याचा अंदाज

हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये ‘या’ कलाकारांनी गमावलाय जीव; अपघात इतका भीषण की शरीराचा एक अवयवही..