“दादा तुमच्यात धाडस असेल तर..”, रोहित पवारांचं अजित पवारांना थेट आव्हान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पवार कुटुंबाची अधिकच चर्चा होऊ लागली आहे. बारामतीच्या निवडणुकीमुळे हा संघर्ष अजूनच वाढत चालला आहे. राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट एकमेकांविरोधात उभे राहीले  आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये तर यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे.

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या आहेत. इथली निवडणूक ही अजित दादा आणि शरद पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांकडून सध्या येथे जोरदार प्रचार सुरू आहे. सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार असल्याने येथे भाजपची मंडळीही प्रचारासाठी उतरली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही दिग्गज नेते प्रचार करत आहेत.

रोहित पवार vs अजित पवार

अशात आमदार रोहित पवार आणि अजित दादा यांच्यातील शाब्दिक युद्धही सतत दिसून येतंय. दोघेही एकमेकांवर बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता पुन्हा एकदा रोहित पवारांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधत टोलेबाजी केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे.

आज दौंड तालुक्यातील वरवंडमध्ये महाविकास आघाडीची सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. या सभेत शरद पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, भास्कर जाधव, रोहित पवार, भूषणसिंह होळकर उपस्थित होते. याच सभेमध्ये आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी स्थानिकांना संबोधित करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं.

रोहित पवारांचं अजित दादांना आव्हान

“आमचा एक नेता पळून नेला आणि इथं उभं केलं. त्यांना वाटत होतं की पवारसाहेब या मतदादरसंघात अडकून पडतील. पण साहेबांनी राज्यात 54 सभा घेतल्या. अजितदादा तुमच्यात जर धाडस असेल तर किरीट सोमय्या यांना तुमच्या प्रचारासाठी बोलवा. महाराष्ट्र कधीच गुडघ्यावर येत नाही. आमचा हा वस्ताद तुम्हाला गुडघ्यावर आणेल.”, असं म्हणत रोहित पवारांनी (Rohit Pawar) अजित पवारांना आव्हान दिलं आहे.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, “तुम्ही पवारसाहेबांना वडील म्हणत होतात. पण जनतेला आता वाटतंय की, तुम्ही वडिलांचे झाले नाहीत, तर जनतेचे काय होणार? ऊसाची चिंता करू नका. एकाचाही ऊस मी शिल्लक ठेवणार नाही… उद्या पवार साहेबांचा पालकमंत्री असणार आहे. पवार साहेब तुमच्या पाठीशी भक्कपणे उभे राहतील.”

News Title : Rohit Pawar target Ajit Pawar on election 

महत्त्वाच्या बातम्या –

सूरत, इंदौरनंतर ‘या’ मतदारसंघात चक्र फिरली!

“कोल्हापूरमध्ये मर्दांची कमी आहे काय?, कशाला हवं टेस्ट ट्यूब बेबी?”

पुणे शहरातील पूर नियंत्रणासाठी मुरलीधर मोहोळ यांची मोठी योजना

“बहिणीने भावाच्या घरी जास्त दिवस थांबू नये”

प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कँडल प्रकरणी धक्कादायक खुलासा समोर!