श्रीरंग बारणेंचं काम केलं नाही, तर राजकीय भवितव्य धोक्यात!; अजितदादांच्या दट्ट्याने सगळी राष्ट्रवादी लागली कामाला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

PCMC News | “संजोग वाघेरे सांगतायेत की, मीच त्यांना तिकडे पाठवलं, लढायला लावलं. हे सगळं खोटं असून अफवांवर विश्वास ठेवू नका.” अजितदादांचे हे वाक्य आहे, दिनांक 8 एप्रिल रोजी काळेवाडी येथे झालेल्या महायुतीच्या पदाधिकारी मेळाव्यातलं… राष्ट्रवादीवर होणाऱ्या आरोपांचे खंडन करून मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी अजितदादांनी कार्यकर्त्यांना रान मोकळे करून दिले. परंतू, या मेळाव्यापूर्वी पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. तो सर्व इतिहास मावळ लोकसभेतील जनतेच्या समोर आजही जसाच्या तसा आहे.

शिवसेनेत फुट पडल्यापासून मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी स्वतःला तिसऱ्या टर्मचा उमेदवार म्हणून घोषित केले होते. परंतू पुढे युतीत राष्ट्रवादी अजित दादा गटाचा समावेश झाला आणि युतीची महायुती झाली अन् मावळ लोकसभा मतदारसंघ महायुतीपुढे पेच म्हणून उभा ठाकला. याचे प्रमुख कारण होते ते म्हणजे मावळ लोकसभेवर भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी महायुतीतील तिन्ही प्रमुख घटकपक्षांनी आपला दावा सांगितला होता. हा दावा सांगण्यात आणि श्रीरंग बारणे यांना विरोध करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे आमदार सुनिल शेळके हे आघाडीवर होते. (PCMC News)

दिवस बदलले, विरोधक मुख्य प्रचारक झाले परंतू…

दिवस बदलले आणि महायुतीकडून अधिकृतरित्या श्रीरंग बारणे यांना उमेदवारी घोषित झाली. त्यापाठोपाठ भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या शिर्षस्थ नेत्यांनी आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना युतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले. सुरुवातीला आदेश आणि त्यानंतर काळेवाडी येथील मेळाव्यात तर अजित पवार यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना दट्ट्याच दिला. ‘सर्व झालं गेलं विसरून जाऊन श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला लागा’ असे आदेश त्यांनी नेते-पदाधिकारी-कार्यकर्ते यांना दिले. या मेळाव्यानंतर लगेचच राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाषा बदलून गेल्याचे दिसून आले. युतीचा धर्म पाळून प्रचारात उतरायला त्यांनी सुरुवात केली. आमदार सुनिल शेळके यांनीही ‘अजित दादा सांगतील तसं’, अशी स्पष्टोक्ती देत बारणेंच्या प्रचारात स्वतःला झोकून दिलं. बारणेंचा (Shrirang Barne) फॉर्म भरणे असो किंवा प्रचाराचा नारळ फोडणे असो, अजितदादा, आमदार शेळके आणि राष्ट्रवादीचे नेते-पदाधिकारी हिरीरीने सहभाग घेत फ्रंटफुटला दिसतायेत.

अजितदादांचा रामबाण उपाय-

तरीही, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते-पदाधिकारी पूर्ण ताकदीने आणि मनाने प्रचार करत नसल्याची चर्चा होत राहिली. त्यामुळे अखेर अजितदादांनी रामबाण उपाय केला आणि त्याचा फरकही तत्काळ दिसून आला. काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड (PCMC News) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्वतः उमेदवार श्रीरंग बारणे यांनीच राष्ट्रवादीच्या सर्वच नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भविष्याच्या दृष्टीने अजितदादांच्या नावाने एक प्रेमळ सल्ला दिला. “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार हे शब्दाला पक्के आहेत. त्यांनी महायुतीला शब्द दिलेला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील विजयी होणाऱ्या उमेदवाराचेच काम करून स्वतःच्या राजकीय भविष्याची काळजी घ्यावी,’ असा सल्ला बारणे (Shrirang Barne) यांनी दिला. परंतू त्यांच्या या सल्ल्यात अजितदादांच्या मनातला हेतू आणि विचार काय असेल, ते राष्ट्रवादीच्या पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी जाणून घेतले आणि सर्वजण झाडून बारणेंच्या प्रचाराला लागले आहेत. (PCMC News)

‘श्रीरंग बारणेंना सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादीची’-

अजित पवार यांच्या थेट इशाऱ्यानंतर मावळ लोकसभेतील चित्र आता बदलल्याचे दिसत आहे. गल्लीबोळातील कार्यकर्त्यांपासून ते राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी, नेते लोकप्रतिनिधी श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला हजेरी लावत आहेत. एकीकडे भाजपा मोदींच्या ‘अबकी बार 400 पार’ नाऱ्याला प्रतिसाद देत बारणेंच्या विजयासाठी झटत असताना आता राष्ट्रवादी देखील तन-मन पूर्वक प्रचारात उतरली आहे. त्याचाच परिपाक म्हणजे, शुक्रवारी (दि. 3 मे) कर्जत येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात आमदार सुनिल शेळके यांनी एक मोठे विधान केले. एकेकाळी बारणेंच्या (Shrirang Barne) उमेदवारीला तीव्र विरोध करणाऱ्या शेळके यांनी, ‘मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसची राहिल’ असे विधान करून प्रचाराचा सर्व चेहराच बदलून टाकला आहे. राष्ट्रवादीच्या या आघाडीने श्रीरंग आप्पा बारणे यांचा विजय अधिक सोप्पा झालाय, हे निश्चित.

News Title: pcmc news shrirang barne vs sanjog waghere

महत्त्वाच्या बातम्या-

“ब्लाऊज काढून तुझी ब्रा…”; अभिनेत्री माधुरी दीक्षितबद्दल नव्या खुलाश्याने बॅालिवूडमध्ये एकच खळबळ

अजित पवारांच्या आईने घेतली कुणाची बाजू?, भाऊ श्रीनिवास यांचा धक्कादायक गौप्यस्फोट

कंगनाची जीभ घसरली!, प्रचाराच्या गडबडीत ‘या’ बड्या भाजप नेत्यावरच केली टीका

बँकेचे कामे उरकून घ्या;’या’ दिवशी शहरातील बँका राहणार बंद

“अजिबात एक रूपया सोडायचा नाही, पण…”; धैर्यशील मोहिते-पाटलांचं मोठं वक्तव्य