कोविड लसीमुळे श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला? नेमकं काय म्हणाला अभिनेता…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Covid Vaccine l बॉलीवूड अभिनेता श्रेयस तळपदेसाठी 2023 हे वर्ष खूप वाईट होते. कारण गेल्या वर्षी 14 डिसेंबर रोजी श्रेयसला त्याच्या ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाच्या शूटिंगनंतर अस्वस्थतेची तक्रार जाणवू लागल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्याला मुंबईतील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. मात्र आता यासंदर्भात एक मोठा दावा केला जात आहे.

Covid Vaccine l लसीमुळे श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला का? :

श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर डॉक्टरांना त्याची अँजिओप्लास्टी करावी लागली आहे. पण आता अभिनेता पूर्णपणे बरा आहे. मात्र अशातच आता श्रेयस तळपदेच्या हृदयविकाराच्या झटक्याबद्दल बोलले जात आहे. श्रेयसला हृदयविकाराचा झटका हा कोविड -19 लसीचा दुष्परिणाम असू शकतो.

श्रेयसने सांगितले की, त्याने त्याच्या तब्येतीची काळजी घेतली आणि तरीही त्याला हृदयविकाराचा झटका आला. तसेच लस घेतल्यानंतर अनेक लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे हे मी नाकारू शकत नाही.

स्वतःबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, ‘मी धूम्रपान करत नाही, मी नियमित मद्यपान करणारा नाही, मी महिन्यातून एक किंवा दोनदा दारू पितो. तंबाखू खात नाही. पण ‘हो, माझे कोलेस्ट्रॉल थोडे वाढले होते, जे मला सांगितले गेले होते की ते आता सामान्य आहे. मी यासाठी औषध घेत होतो आणि ते बऱ्याच प्रमाणात कमी झाले होते. मला मधुमेह नाही, रक्तदाबाचा त्रास नाही, मग मला हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण काय आहे असा सवाल श्रेयसनी उपस्थित केला आहे.

कोविड-19 लास घेतल्यानंतर मला थकवा जाणवू लागला :

आरोग्याबाबत सावध राहूनही असे होत असेल तर दुसरे काय कारण असावे असा श्रेयस म्हणाला आहे. तसेच ‘कोविड-19 नंतरच मला थकवा जाणवू लागला हा सिद्धांत मी नाकारू शकत नाही. यात नक्कीच काहीतरी आहे आणि आपण ते नाकारू शकत नाही. कदाचित ही कोविड लस घेतली आहे कारण आपण आपल्या शरीरात काय घेतले आहे हे आपल्याला खरोखर माहित नाही.

कोविड -19 आहे की लस आहे याची खात्री नाही, कारण त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, त्यामुळे कोणतेही विधान करणे व्यर्थ आहे. मात्र कोविड लसीचे दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात. ही लस बनवणाऱ्या AstraZeneca या कंपनीने ब्रिटनच्या उच्च न्यायालयात हे मान्य देखील केले आहे.

News Title – Did Shreyas Talpade have a heart attack due to Covid Vaccine?

महत्वाच्या बातम्या

ईडीची मोठी कारवाई! ‘या’ मंत्र्याच्या पीएच्या घरी मिळाले ढीगभर पैसे; अधिकारीही चक्रावले

मी काय पाकिस्तान किंवा बांगलादेशातून आलीय का?, मराठा समाजाच्या विरोधामुळे पंकजा मुंडे संतापल्या

तुमचे रक्त माझे चित्र काढण्यासाठी सांडण्यापेक्षा… फडणवीसांचा कार्यकर्त्याला मोलाचा सल्ला

शरद पवार यांची तब्येत बिघडली, डॅाक्टरांनी दिला हा महत्त्वाचा सल्ला

पुढील दोन दिवसात ‘या’ दोन राशींना प्रचंड धनलाभ होईल