ईडीची मोठी कारवाई! ‘या’ मंत्र्याच्या पीएच्या घरी मिळाले ढीगभर पैसे; अधिकारीही चक्रावले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

ED Raid l लोकसभा निवडणुकीदरम्यान झारखंडमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. यावेळी झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या घरगुती नोकराच्या घरावर छापा टाकण्यात आला. या छापेमारीदरम्यान ईडीने मोठी रोकड जप्त केली आहे. या घटनेनंतर झारखंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

रोकड पाहून अधिकारी देखील चक्रावले :

याप्रकरणी ईडीने अटकेची कारवाई करत झारखंड ग्रामविकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांना ताब्यात घेतलं आहे. झारखंडमधील ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांच्या अंमबजावणीत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून तपास सुरू आहे.

वीरेंद्र राम प्रकरणात झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे घरातील सहाय्यक संजीव लाल यांच्याकडून मोठी रोकड जप्त करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान नोटांच्या बंडलांचे ढीग पडले आहेत, ते पाहून अधिकारीही चक्रावून गेले आहेत, त्यांची मोजणी करण्यासाठी यंत्रे मागवण्यात आली आहेत. तसेच ही रोकड 20 ते 30 कोटींच्या दरम्यान असल्याचा अंदाज ईडीने वर्तवला आहे.

Jharkhand ED Raid l वीरेंद्र राम यांना ईडीने घेतलं ताब्यात :

ईडीच्या अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये या नोटा घरात कशा ठेवल्या गेल्या हे दिसत आहे. बॅग, सुटकेस आणि पॉलिथिनमध्ये नोटांचे बंडल ठेवले होते. अधिकारी घराच्या कानाकोपऱ्यात झडती घेत आहेत.

ईडीने फेब्रुवारी 2023 मध्ये झारखंडच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचे मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांना अटक केली होती. त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. काही योजनांच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास यंत्रणेने वीरेंद्र राम यांच्यावर कारवाई केली होती. एजन्सीने 2019 मध्ये त्याच्या एका उप-ऑर्डिनेटकडून मोठ्या प्रमाणात रोख जप्त केली होती. नंतर ईडीने पीएमएलए अंतर्गत प्रकरण ताब्यात घेतले.

News Title – ED arrests chief engineer Virendra Kumar Ram

महत्वाच्या बातम्या

मी काय पाकिस्तान किंवा बांगलादेशातून आलीय का?, मराठा समाजाच्या विरोधामुळे पंकजा मुंडे संतापल्या

तुमचे रक्त माझे चित्र काढण्यासाठी सांडण्यापेक्षा… फडणवीसांचा कार्यकर्त्याला मोलाचा सल्ला

शरद पवार यांची तब्येत बिघडली, डॅाक्टरांनी दिला हा महत्त्वाचा सल्ला

पुढील दोन दिवसात ‘या’ दोन राशींना प्रचंड धनलाभ होईल

राहा कपूरची चाचूसोबत फुल्ल धम्माल-मस्ती; क्युट व्हिडीओ तूफान व्हायरल