Pankaja Munde l लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक नेत्यांनी कामावर कसलेली पाहायला मिळत आहे. अशातच संपूर्ण राज्यच लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांनी पाटोदा येथील प्रचारसभेत मनातील खंत थेट व्यक्त केली आहे. या सभेदरम्यान पंकजा मुंडे यांनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे.
पंकजा मुंडेंनी विरोधकांना खडेबोल सुनावले :
बीड लोकसभा मतदार संघातील उमेदवार पंकजा मुंडे यांनी त्यांच्या विरोधातील ट्रोलिंग करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहे. आपल्यावर हातापाया पडून मतदान मागण्याची वेळ अजूनतरी आलेली नाही. लोकशाहीमध्ये मतदान अगदी नम्रपणे मागितले जाते. पण आपल्यावर ही वेळ आली आहे असे आपल्या सहकाऱ्यांना वाटत आहे. लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे. तसेच माझ्यामध्ये काही अवगुण आहे का ? काही खोट आहे का? मी कधी कोणाला त्रास दिला आहे का? असा थेट सवाल पंकजा मुंडे यांनी प्रचारसभेत उपस्थित केला आहे.
यावेळी पंकजा मुंडे यांनी रोखठोक शब्दांत मत व्यक्त केलं आहे. तुमचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींना समजून मला मत करा. मी काय पाकिस्तान, बांगलादेशातून आली आहे का ? असा थेट सवाल पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना केला आहे. तसेच आपली निवडणूक राष्ट्रीय स्तरावरुन पुन्हा लोकल पातळीवरच म्हणजेच बीडमध्येच आली आहे. मी परळीत आमदार म्हणून सुरुवात केली, ग्रामीण भागात सर्वात जास्त शौचालये माझ्या कारकीर्दीत झाल्याचे देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले आहे.
Pankaja Munde l बँकेत कर्ज घेताना जसे रेकॉर्ड तपासले जाते तसेच माझेही रेकॉर्ड तपासा
बीड लोकसभा मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी त्यांच्यावर सोशल मीडियावर होत असलेल्या ट्रोलींग विरोधात जोरदार टीका केली आहे. आपल्यात काही खोट आहे का? बीड जिल्ह्यातील मी काम केले आहे. बँकेत कर्ज घेताना जसे रेकॉर्ड तपासले जाते अगदी तसेच माझेही रेकॉर्ड तपासले पाहिजे असे पंकजाताई म्हणाल्या आहेत.
बीडमध्ये शेतकरीवर्ग दुष्काळाने हवालदिल झाला असताना मी त्या शेतकऱ्यांना पीक विमा दिला आहे असेही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले आहे. याशिवाय 992 कोटीचा विमा देखील मी मंजूर करुन दिला आहे. परंतू निवडणूक लागली की मते हडपायला येतात अशी जोरदार टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे.
News Title – Lok Sabha Beed News Pankaja Munde Made A Powerful Speech At Patoda
महत्त्वाच्या बातम्या
तुमचे रक्त माझे चित्र काढण्यासाठी सांडण्यापेक्षा… फडणवीसांचा कार्यकर्त्याला मोलाचा सल्ला
शरद पवार यांची तब्येत बिघडली, डॅाक्टरांनी दिला हा महत्त्वाचा सल्ला
पुढील दोन दिवसात ‘या’ दोन राशींना प्रचंड धनलाभ होईल
राहा कपूरची चाचूसोबत फुल्ल धम्माल-मस्ती; क्युट व्हिडीओ तूफान व्हायरल
जवळच्या व्यक्तीकडूनच अनन्या पांडेच्या ‘त्या’ गोष्टीबद्दल खुलासा, बाॅलिवूडमध्ये एकच खळबळ!