शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar l राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचे आजचे कार्यक्रम रद्द केले आहेत.

शरद पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द :

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी रविवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खासदार सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ बारामती येथे लोकसभा निवडणूक 2024 च्या सभेला संबोधित करताना शरद पवार यांना घशाचा त्रास झाला आहे. त्यामुळे त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

शरद पवार हे लोकसभा निवडणुका 2024 मध्ये महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांसाठी सक्रियपणे प्रचार करत आहेत. बारामती मतदारसंघात तीन वेळा खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांचा सामना सुनेत्रा पवार यांच्याशी होणार आहे. बारामती ही राज्यातील 11 लोकसभा जागांपैकी एक आहे, जिथे तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच उद्या 7 मे रोजी मतदान होणार आहे.

Sharad Pawar l डॉक्टरांनी दिला विश्रांती करण्याचा सल्ला :

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठका आणि कार्यक्रमांच्या नियोजनात शरद पवार सतत व्यस्त आहेत. पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी ते स्वत: सातत्याने निवडणूक कार्यक्रमात सहभागी होत आहेत. रविवारी त्यांची तब्येत बिघडली असतानाही ते बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या हितार्थ आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत होते. काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात निलेश लंके यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर त्यांनी घसा दुखत असल्याचे सांगितले होते.

या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे.त्यामुळे त्यांची दगदग झाल्याने शरद पवारांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सध्या डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.

News Title – Sharad pawar health updates

महत्त्वाच्या बातम्या

“धोनीने खेळूच नये, चेन्नईने त्याच्या जागी..”; धोनी शून्यावर बाद झाल्याने ‘हा’ खेळाडू संतापला

बारामतीत प्रचार थंडावला, शरद पवारांनी लावली टाईट फिल्डींग

“आढळराव आणखी किती खोटं बोलणार आहात?”

कोविड लसीमुळे श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला? नेमकं काय म्हणाला अभिनेता…

ईडीची मोठी कारवाई! ‘या’ मंत्र्याच्या पीएच्या घरी मिळाले ढीगभर पैसे; अधिकारीही चक्रावले