काळजी घ्या! ‘या’ जिल्ह्यांवर सूर्य आग ओकणार; हवामान विभागाचा इशारा

Heat Alert

Maharashtra Weather Update | राज्यात काही जिल्हयामध्ये तापमान चाळीशी पार गेलं आहे. तापमानात वाढ झाल्याने शरीराची लाही-लाही झाली आहे. दुपारी उकाडा आणि उष्णतेच्या झळामुळे बाहेर पडण अवघड झालंय. घरात देखील दमट वातावरण निर्माण होत आहे.

आता येत्या दोन-तीन दिवसांत अजून तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रविवारी राज्यात सोलापूर आणि अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. दोन्ही जिल्ह्यात तापमान 44.3 डिग्री सेल्सिअस ऐवढे होते.

राज्यामध्ये वाऱ्याची चक्रीय स्थिती मराठवाडा व लगतच्या भागावर आहे. वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा ही आता मराठवाड्यापासून तमिळनाडूपर्यंत जात आहे. त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

तर, पुढील दोन दिवस मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सहा व सात तारखेला तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तसंच नांदेड आणि लातूर जिल्ह्यात देखील विजांचा कडकडाट व वादळी वारे वाहतील.

येथे उष्णतेची लाट येणार

विदर्भात अकोला जिल्ह्यात पाच व सहा तारखेला तर चंद्रपूर जिल्ह्यात पाच तारखेला उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन (Maharashtra Weather Update ) करण्यात आलंय.

पुण्यात ‘असं’ राहील तापमान

पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात 7 मे पर्यंत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर 11 मे पर्यंत आकाश निरभ्रच राहील.  पुण्यात रविवारी 40.3डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

News Title- Maharashtra Weather Update Heat wave alert

महत्त्वाच्या बातम्या –

शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!

“धोनीने खेळूच नये, चेन्नईने त्याच्या जागी..”; धोनी शून्यावर बाद झाल्याने ‘हा’ खेळाडू संतापला

बारामतीत प्रचार थंडावला, शरद पवारांनी लावली टाईट फिल्डींग

“आढळराव आणखी किती खोटं बोलणार आहात?”

कोविड लसीमुळे श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला? नेमकं काय म्हणाला अभिनेता…

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .