“फडणवीसांची गांडू शिवसेना काय करते?”, संजय राऊत संतापले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut | महाराष्ट्रातील महत्त्वाचं शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. मात्र आता याच मुंबईमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना पक्षाची सत्ता होती. मात्र गेल्या दीड वर्षांत शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेना ही मराठी माणसांच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तर शिंदे यांची शिवसेना ही बुळचट शिवसेना असल्याचा हल्लाबोल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

मराठी मुलांना गुजराती कंपनीने नोकरी नाकारली

नुकताच मराठी मुलीला गुजरातच्या एका कंपनीने नोकरी न देण्याचा मुद्दा गाजत आहे. त्यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. मुंबईमध्ये गुजरात स्थित एक कंपनी होती. त्या कंपनीने मुंबईतील एका मराठी मुलीला नोकरी देण्यास नकार दिला. मराठी माणसाच्या न्याय आणि हक्कासाठी ही शिवसेना स्थापन करण्यात आली. मोदी-शहांनी ही शिवसेना तोडली असल्याचा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

“फडणवीसांची गांडू शिवसेना गप्प”

“शिवसेना शिंदेगट ही बुळचट शिवसेना आहे. ही फडणवीसांची गांडू शिवसेना गप्प आहे. आम्ही बघतो काय करायचं आहे. बहुसंख्य गुजराती राहत असलेल्या मुंबईमधील एका सोसायटीत मराठी आहेत म्हणून येण्यापासून रोखलं गेलं. ही फडणवीसांची गांडू बुळचट शिवसेना काय करते?, असा सवाल राऊतांनी केला.

“काल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आरएसएस समर्थक अधिकाऱ्याने हेमंत करकरेंना गोळी घातली असा आरोप केला. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. शहिद हेमंत करकरे हे देशासाठी लढले. ते एटीएसचे होते तसेच RSS आणि करकरेंमध्ये भांडणं होती. म्हणून अशा गोष्टी समोर येताना दिसत असल्याचं माझं व्यक्तिगत मत आहे,” असं राऊत म्हणाले.

एटीएसने दोघांना पकडले होते. साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहीत, ते दोघे आरएसएसशी संबंधित होते. माझ्याकडे आरएसएसची लोकं यायची आणि करकरेंची चुकीची कारवाई केली असं त्याचं म्हणणं आहे. त्यातून ही थिअरी समोर आली.

पुढे राऊत म्हणाले, “वडेट्टीवार यांचं नाव का घेता? who kill karkare हे पुस्तक कोणी लिहिलंय? हसन मुश्रीफ भाजपसोबत आहेत. त्यांच्या भावाने हे पुस्तक लिहिलं आहे. तेव्हा ते आयजी होते. हा प्रश्न तुम्ही भाजपला विचारा”, असं राऊत म्हणाले आहेत.

News Title – Sanjay Raut Big Statement About Eknath Shinde Shivsena

महत्त्वाच्या बातम्या

“आढळराव आणखी किती खोटं बोलणार आहात?”

कोविड लसीमुळे श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला? नेमकं काय म्हणाला अभिनेता…

ईडीची मोठी कारवाई! ‘या’ मंत्र्याच्या पीएच्या घरी मिळाले ढीगभर पैसे; अधिकारीही चक्रावले

मी काय पाकिस्तान किंवा बांगलादेशातून आलीय का?, मराठा समाजाच्या विरोधामुळे पंकजा मुंडे संतापल्या

तुमचे रक्त माझे चित्र काढण्यासाठी सांडण्यापेक्षा… फडणवीसांचा कार्यकर्त्याला मोलाचा सल्ला