“निलेश लंकेजवळ मायबाप जनता, तुम्हारे पास क्या है?”; अमोल कोल्हेंचं जबरदस्त भाषण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amol Kolhe | शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अहमदनगरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी जाहीर सभा घेतली.या सभेत त्यांनी जोरदार भाषण करत महायुती आणि विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

सभेदरम्यान बोलताना अमोल कोल्हे यांनी दिवार चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्यामध्ये गाजलेला डायलॉग बोलून दाखवला आणि पुढे बोलताना निलेश लंके यांच्याजवळ जनतेचा कौल आहे, असं म्हटलं. अमोल कोल्हे यांच्या आगळ्या वेगळ्या अंदाजाची आता एकच चर्चा रंगली आहे.

नेमकं काय म्हणाले अमोल कोल्हे?

अमोल कोल्हेंनी प्रचारसभेत बोलताना गाजलेला डायलॉग म्हटला. “मेरे पास गाडी है बंगला है तुम्हारे पास क्या है…?”, तशीच परिस्थिती सध्या शिरूर आणि अहमदनगर दक्षिण मतदार संघात असल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. मेरे पास गाडी है, बंगला है, तुम्हारे पास क्या है… असं अमिताभ बच्चन यांच्या आवाजात अमोल कोल्हे (Amol Kolhe ) यांनी म्हटलं.

यावेळी त्यांनी अजित पवार गटावर देखील निशाणा साधला. शिरूर मतदारसंघात मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांच्या अनेक सभा झाल्या आहेत, पुढेही होणार आहेत आणि एक उपमुख्यमंत्री तर त्यांच्या मतदारसंघातील निवडणूक झाल्यानंतर शिरूरमध्येच येऊन बसतील, असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावला.

अमोल कोल्हे यांची डायलॉगबाजी

पुढे बोलताना ते म्हणाले की, “यांच्याकडे दोन उपमुख्यमंत्री, एक मुख्यमंत्री, केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता यासोबतच यंत्रणा आहे. पण, निलेश लंके तुम्हारे पास क्या है?.. पण, आमच्या लंकेकडे जनतेचा कौल आहे. त्यांच्या पाठीमागे जनतेची मते आहेत.”, असं अमोल कोल्हे म्हणाले.

अमोल कोल्हे यांचं हे भाषण सध्या चर्चेत आलं आहे. त्यांच्या अनोख्या अंदाजातील भाषणामुळे ते चर्चेत आले आहेत. दरम्यान, शिरुर मतदारसंघात आज शरद पवार सभा घेणार होते. परंतु शरद पवारांची तब्येत ठीक नसल्यानं ही सभा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती अमोल कोल्हे (Amol Kolhe ) यांनी यावेळी दिली.

News Title –  Amol Kolhe target ajit pawar 

महत्त्वाच्या बातम्या-

“आढळराव आणखी किती खोटं बोलणार आहात?”

कोविड लसीमुळे श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला? नेमकं काय म्हणाला अभिनेता…

ईडीची मोठी कारवाई! ‘या’ मंत्र्याच्या पीएच्या घरी मिळाले ढीगभर पैसे; अधिकारीही चक्रावले

मी काय पाकिस्तान किंवा बांगलादेशातून आलीय का?, मराठा समाजाच्या विरोधामुळे पंकजा मुंडे संतापल्या

तुमचे रक्त माझे चित्र काढण्यासाठी सांडण्यापेक्षा… फडणवीसांचा कार्यकर्त्याला मोलाचा सल्ला