‘आता आमचं ऐका, आता ही खिंड आम्हालाच लढू द्या’; ‘या’ नेत्याची पोस्ट व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघात काल सांगता सभा पार पडली. भाषण करत असताना अनेक राजकीय नाट्य पाहायला मिळालं. रोहित पवार यांचं रडणं तर अजित पवार यांनी रोहित पवार यांची केलेली मिमिक्री यामुळे कालची प्रचारसभेची सांगता सभा जोमात पार पडली. मात्र अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भाषणाने अनेकांचं लक्ष वेधलं गेलं होतं. शरद पवार (Sharad Pawar) यांना बोलता देखील येत नव्हतं त्यांचा आवाज बसला होता. त्यामुळे ते गेले 20 दिवस फिरफिर फिरत आहेत. ते केवळ 4 तास झोप घेत असल्याचं कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सांगितलं. त्यानंतर आता बीड लोकसभा मतदारसंघाचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

बजरंग सोनावणे यांनी आपल्या फेसबुकच्या माध्यमातून शरद पवार यांना साहेब तब्येतीला जपा असं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान आज शरद पवार बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनावणे यांच्या प्रचारसभेसाठी जाणार नाहीत. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. ते गेल्या 20 दिवसांपासून राज्य पिंजून काढत आहेत.

शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट

दरम्यान रोहित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या तब्येतीची महत्त्वाची अपडेट दिली आहे. माध्यमांशी बोलत असताना रोहित पवार म्हणाले की, शरद पवार यांच्या तब्येतीबाबत चौकशी केली. ते गेल्या 20 दिवसांपासून राज्यभरात दौरे करत होते. केवळ 4 तास झोपायचे. यामुळे त्यांना थकवा लागायचा. मात्र सध्या त्यांची प्रकृती ही स्थिर असल्याचं रोहित पवार म्हणाले.

आज बीड येथे दौरा आणि सभा होती, तसेच पुण्यात देखील सभा होती. मात्र त्यांच्या प्रकृतीसंबंधीत अस्वस्थतेमुळे आजचे सर्व कार्यक्रम हे रद्द करण्यात आले असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत. याचपार्श्वभूमीवर बीडचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी शरद पवार यांना काळजी घेण्याबाबत आवाहन केलं आहे. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट शेअर केली आहे.

बजरंग सोनावणे यांची पोस्ट चर्चेत

साहेब, तब्येतीला जपा!
तब्येतीच्या कारणास्तव उद्या माझ्या प्रचारार्थ आयोजित आष्टीतील सभेला आपण येणार नाही, हे समजलं आणि साताऱ्याच्या सभेची आठवण झाली. तेव्हा तुम्ही पावसाला थांबू शकला नव्हतात, पण तेव्हा पाऊसही तुम्हाला थांबू शकला नाही..
तुमची तब्येत खराब झाल्याचे कळले. मागील पाच-सहा दशके अशा निवडणुका कित्येक बघितल्या असतील तुम्ही. तुमच्या नावावरच झाल्या त्या! मागील कित्येक दशके महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला अभिमानानं आव्हान देतो. पण साहेब, आता आमचं ऐका! आता ही खिंड आम्हालाच लढू द्या. तुम्ही फक्त आणि फक्त तब्येतीला जपा.

लढणं, तेही विपरीत परिस्थितीत, तुम्ही या देशाला दाखवून दिलंय. विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो! आता पुढची जबाबदारी आमची. ही निवडणूक आता शरद पवारांचे कार्यकर्ते म्हणूनच लढू द्या! साहेब फक्त प्रकृतीची काळजी घ्या. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही हा इतिहास आहे. तो इतिहास आम्ही जपू, तुम्ही फक्त, तब्येतीला जपा साहेब. आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी राहुद्या.

News Title – Sharad Pawar Take Care Of You Bajrang Sonawane Facebook Post

महत्त्वाच्या बातम्या

काळजी घ्या! ‘या’ जिल्ह्यांवर सूर्य आग ओकणार; हवामान विभागाचा इशारा

शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!

“धोनीने खेळूच नये, चेन्नईने त्याच्या जागी..”; धोनी शून्यावर बाद झाल्याने ‘हा’ खेळाडू संतापला

बारामतीत प्रचार थंडावला, शरद पवारांनी लावली टाईट फिल्डींग

“आढळराव आणखी किती खोटं बोलणार आहात?”