“..तर बॉलिवूडला कायमचा रामराम करेन”; कंगना रनौतची मोठी घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kangana Ranaut | बॉलीवुडची ड्रामा क्वीन अभिनेत्री कंगना रनौत आता राजकारणात उतरली आहे. कंगनाला भाजपने थेट लोकसभेचे तिकीट दिलं आहे. ती हिमाचल प्रदेश मंडी येथून निवडणूक लढवत आहे. कंगना सध्या जोरदार प्रचार करताना दिसून येत आहे.

आता कंगनाने एक मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या फक्त आणि फक्त कंगनाचीच चर्चा रंगली आहे. एका मुलाखतीदरम्यान कंगनाने चित्रपट, लोकसभा निवडणूक आणि राजकारण याविषयी मत मांडले. त्याचवेळी कंगनाने तिच्या फिल्मी करिअरबाबत एक मोठी घोषणा केली.

काय म्हणाली कंगना रनौत?

मुलाखतीमध्ये कंगनाला चित्रपट आणि राजकारण कसं सांभाळशील?, असा सवाल करण्यात आला. त्यावर “मी चित्रपटात अभिनयही करते, भूमिकाही करते आणि दिग्दर्शनही करते. निवडणुकीत जिंकले आणि राजकारणात येण्याची शक्यता दिसली तर मी राजकारणच करेन. खरंतर , मला एका वेळेला एकच गोष्ट करायला आवडेल.”, असं कंगना (Kangana Ranaut ) म्हणाली आहे.

“जर मी मंडीतून विजयी झाले तर मग मी राजकारणच करेन.अनेक चित्रपट निर्माते मला सांगतात, की राजकारणात जाऊ नकोस. पण तुम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. माझ्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे लोकांना त्रास होत असेल तर ते योग्य नाही. मी एक प्रिव्हिलेज्ड आयुष्य जगलं आहे. आता जर मला लोकांशी संवाद साधण्याची, त्यांच्याशी जोडलं जाण्याची संधी मिळत असेल तर मी ते देखील स्वीकारेन.”, असंही कंगना म्हणाली आहे.

“निवडणुकीत जिंकली तर..”

त्यामुळे सध्या कंगनाच्या या विधानाचीच चर्चा रंगली आहे. आता लोकसभा निवडणुकीमध्ये कंगना विजयी होणार की ती पुन्हा बॉलीवुडमध्ये वापसी करणार, हे पाहणं महत्वाचं ठरेल. सध्या तरी कंगना निवडणुकीच्या प्रचार सभामधील भाषणांमुळे चर्चेत आलीये.

कंगनाच्या (Kangana Ranaut ) फिल्मी करीअरबद्दल बोलायचं झाल्यास, ती आत्तापर्यंत गँगस्टर, क्वीन, थलाइवी, तनु वेड्स मनु, फॅशन, मणिकर्णिका, यासारख्या अनेक दमदार चित्रपटात झळकली. इमर्जन्सी हा तिचा आगामी चित्रपट असून त्यामध्ये तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. येत्या जून महिन्यात हा चित्रपट रिलीज होईल.

News Title-  Kangana Ranaut Big Statement on Bollywood Career

महत्त्वाच्या बातम्या –

“निलेश लंकेजवळ मायबाप जनता, तुम्हारे पास क्या है?”; अमोल कोल्हेंचं जबरदस्त भाषण

“फडणवीसांची गांडू शिवसेना काय करते?”, संजय राऊत संतापले

काळजी घ्या! ‘या’ जिल्ह्यांवर सूर्य आग ओकणार; हवामान विभागाचा इशारा

शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!

“धोनीने खेळूच नये, चेन्नईने त्याच्या जागी..”; धोनी शून्यावर बाद झाल्याने ‘हा’ खेळाडू संतापला