“मी देवघरातील मुर्त्या फेकल्या….”; प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shekhar Suman | बॉलिवूडचे दिग्दर्शक संजय लिली भन्साळी यांचा हिरामंडी या सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका केलेले अभिनेते शेखर सुमन (Shekhar Suman) यांचं नाव हे अव्वल स्थानी आहे. अभिनयाचा मोठा अनुभव अनेक चित्रपटातून त्यांनी कामं केली आहेत. कधी कधी मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्यांची आपल्याला एक बाजू पाहायला मिळते. पण त्यांच्या दुसरी बाजू ही फारच खडतर असते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेते शेखर सुमन (Shekhar Suman) होय.

शेखर सुमन (Shekhar Suman) यांनी आपल्या 11 वर्षांच्या मुलाला कायमचं गमावलं. यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते हे केवळ त्या वडिलांच्या हृदयालाच ठाऊक. मुलाच्या निधनानंतर शेखर सुमन यांचा देवावरून विश्वास उडाला होता. त्यांनी सर्व देव हे देवघरातून काढून फेकून दिले होते. त्याचा हा किस्सा स्वत: शेखर सुमन यांनी सांगितला होता.

शेखर सुमन यांनी व्यक्त केली मनातील सल

“चमत्कार व्हावा यासाठी मी दररोज देवाकडे प्रर्थाना करत असायचो. मात्र चमत्कार घडला नाही. जोरदार पाऊस पडत होता. नेमकी त्यादिवशी माझ्या मुलाची तब्येत बिघडली होती. मी शुटिंगला जाण्यासाठी दिग्दर्शकाला नकार दिला होता. मात्र दिग्दर्शकाने मला दोन तासांचं शुटिंग आहे, असं सांगितलं होतं. तेव्हा मी निघालो त्यावेळी मला माझा मुलगा आयुषने हाताला धरलं आणि न जाण्यास विनंती केली. मी पुन्हा परत लवकर येईल असं सांगून मी गेलो. तो क्षण मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही”.

shekhar suman son

“माझ्या देवघरातील देव काढून फेकले”

मुलाच्या जाण्याने माझा कशावरच विश्वास राहिला नव्हता. माझ्या देवघरातील देव मी बाहेर काढून फेकून दिले होते. मंदिरसुद्ध बंद केलं होतं. ज्या देवाने मला इतका त्रास दिला. त्याकडे मी कधीच जाणार नाही असं ठरवलं.

देवाने माझ्या सुंदर निरागस मुलाला हिरावून नेलं आहे. मी त्या धक्क्यातून अद्यापही बाहेर निघालो नाही. आज प्रत्येक दिवशी मला माझ्या मुलाची आठवण येतेय, असं अभिनेता शेखर सुमन म्हणालेत. मुलाच्या उपचारासाठी ते मुलाला लंडनला घेऊन गेले होते. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. कॉम्प्लिकेशनमुळे मुलावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होऊ शकली नाही.

आयुष्यात मला इतकं असहाय्य कधीच वाटलं नव्हतं. जगातिल नामांकित डॉक्टरांची मदत घेऊनही माझ्या मुलाच्याबाबतीत चमत्कार घडला नव्हता. एवढंच नाहीतर मी बुद्धधर्माकडेही वळालो होतो, शेखर सुमन यांनी रोडिओला मुलाखत देत असताना आपल्या मनातील भावना पहिल्यादाच व्यक्त केल्या.

News Title – Shekhar Suman Say About His Son Death After Danger Incidence

महत्त्वाच्या बातम्या

जवळच्या व्यक्तीकडूनच अनन्या पांडेच्या ‘त्या’ गोष्टीबद्दल खुलासा, बाॅलिवूडमध्ये एकच खळबळ!

सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी पुण्यात मेट्रोचे… मुरलीधर मोहोळ यांची मोठी घोषणा

श्रीरंग बारणेंचं काम केलं नाही, तर राजकीय भवितव्य धोक्यात!; अजितदादांच्या दट्ट्याने सगळी राष्ट्रवादी लागली कामाला

“ब्लाऊज काढून तुझी ब्रा…”; अभिनेत्री माधुरी दीक्षितबद्दल नव्या खुलाश्याने बॅालिवूडमध्ये एकच खळबळ

अजित पवारांच्या आईने घेतली कुणाची बाजू?, भाऊ श्रीनिवास यांचा धक्कादायक गौप्यस्फोट