रोहित पवारांचा धक्कादायक दावा; अजित पवार अडचणीत?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड असेल याबाबत उद्या तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी बारामतीकर आपलं मत देणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघ हा एक प्रतिष्ठेचा विषय आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असलेले पाहायला मिळत आहे. तसेच दमदाटीचं राजकारण करत असल्याचा आरोप अजित पवार गटावर होताना दिसत आहे. यासंबंधीत रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवार यांचा प्रचार करण्यासाठी गुंडांचा वापर केला जात असल्याची एक पोस्ट केली होती त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

व्वा दादा व्वा, पक्षाचा प्रचार करण्यासाठी गुंडांचा वापर करताना दिसत आहेत. याला वेळीस आवर घालण्यासाठी उद्याचं मतदान हे फार महत्त्वाचं असणार आहे असं रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले आहेत. त्यांनी ट्विट करत अजित पवार गुंडांना घेत प्रचार करताना दिसत असल्याचा दावा आपल्या ट्विटच्या माध्यमातून केलाय.

रोहित पवार यांचं ट्विट जसंच्या तसं

“स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे ‘विचार’ घेऊन राजकारण करतो, असं सांगणाऱ्या अजितदादांना निवडणुकीत मात्र खून, खंडणी, धमकी, अपहरण, मोक्का यांसारख्या गुन्ह्यातील गुन्हेगारांची आणि टोळी प्रमुखांची मदत घ्यावी लागतेय…” अशी पोस्ट रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली होती.

“व्वा दादा व्वा! सामान्य लोकं प्रचार करण्याऐवजी गुंडच अजितदादांचा खुलेआम प्रचार करतायेत आणि या प्रवृत्तीला वेळीच रोखण्यासाठी उद्याचा मतदानाचा दिवस सर्वांत महत्त्वाचा आहे!”, असं रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोस्ट केलीये.

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार यांच्यात टफ फाईट होणार आहे. दोन्ही उमेदवार हे आता ताकदीचे पाहायला मिळत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत होते. काल बारामती मतदारसंघात प्रचार सभांची तोफ थंडावली गेली. रोहित पवार यांचं भावूक होणं आणि त्यावर अजित पवार यांनी मिमिक्री करणं यामुळे कालच्या प्रचारसभेला रंग मिळाला होता. तर शरद पवार यांची प्रकृती खालावली होती.

अशातच आज रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट दिली आहे. ते गेले 20 दिवस महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. ते केवळ 4 तास झोपत होते. त्यामुळे त्यांचा आजचा पुणे आणि बीडचा दौरा रद्द करण्यात आला आहे. मात्र सध्या शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचं रोहित पवार म्हणाले.

News Title – Rohit Pawar Tweet About Ajit Pawar Provide Gangster For NCP Party Campaign Baramati Loksabha 2024

महत्त्वाच्या बातम्या

येत्या सहा दिवसांत ‘या’ राशींचे नशीब पालटणार; संपत्तीत होणार चिक्कार वाढ

“मी देवघरातील मुर्त्या फेकल्या….”; प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा

“..तर बॉलिवूडला कायमचा रामराम करेन”; कंगना रनौतची मोठी घोषणा

‘आता आमचं ऐका, आता ही खिंड आम्हालाच लढू द्या’; ‘या’ नेत्याची पोस्ट व्हायरल

“निलेश लंकेजवळ मायबाप जनता, तुम्हारे पास क्या है?”; अमोल कोल्हेंचं जबरदस्त भाषण