बायको म्हणावी की कसाई; नवऱ्याला बांधून ठेवलं नंतर प्रायव्हेट पार्टला दिले चटके

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Crime News | दोन्ही चाकं चालू लागली तर गाडा पुढे सरकतो. नवरा-बायको हे संसाराच्या गाड्याची दोन चाकं आहेत. त्यातील एक जरी चाक बंद पडलं तरीही संसार उध्वस्त होतो. अशी एक घटना आता समोर आली आहे. पत्नीनेच नवरा आणि बायकोच्या नात्याला कलंक लावला असल्याचं पाहायला मिळालं. पत्नीने आपल्या नवऱ्याला बेडवर झोपवून त्याच्या प्रायव्हेट पार्टवर चटके दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे घडली.

निर्दयी पत्नीने पलंगावर बसून आपल्या पतीच्या शरिरावर तिने चटके दिले आहेत. पतीला जेवढे चटके दिले गेले तितके तिला चांगलं वाटत होतं. तो तिच्यावर ओरडायचा. एवढंच नाहीतर तिने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर चाकू ठेवला होता.

पत्नीकडून होणाऱ्या अत्याचाराची गोष्ट पतीने पोलिसांना सांगितली. पोलीसांच्या पायाखालची जमीन सरकली. हे एकूण पोलीस हैराण झाले होते. पुरावा म्हणून पतीने आपले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले होते. पत्नीने आपल्या पतीवर केलेला आत्याचार स्पष्टपणे दिसतोय. सीसीटीव्ही आणि पतीच्या जुबानीवर पत्नीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पत्नीला अटक केल्याची माहिती समोर आलीये. (Crime News)

दोघांचं लव्ह मॅरेज

दोघांचं लव्ह मॅरेज होतं. 17 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांनी मुस्लिम धर्मानुसार विवाह केला. युवकाच्या वडिलांचं असं म्हणणं आहे की पत्नीच्या जेव्हा मनात येतं तेव्ही ती आपल्या पतीला मारहाण करते. बेडवर क्रूर वागणूक देते. हे बाहेर कसं काढायचं यासाठी युवकाने बेडरूममध्ये सीसीटीव्ही लावला होता. त्यामुळे त्या पतीकडे आपल्या पत्नीविरोधातील आत्याचाराचे पुराव्यानीशी व्हिडीओ समोर आला. (Crime News)

एवढंच नाहीतर तिने आपल्या पत्नीला दुधात गोळ्या मिसळून दुध प्यायला दिले होते. तेव्हा तो पती बेशुद्ध झाला होता. त्यानंतर पत्नीने त्याला चटके दिले. त्याच्या प्रायव्हेट पार्टवर चटके दिले होते. हे सर्व पाहूण त्या पीडित पतीने पोलिसांत तक्रार केलीये. यावेळी पोलिसांना ऐकलेल्या घटनेवर तक्रार नोंदवून घेतली आहे. मात्र याबाबत अद्यापही मोठी अपडेट समोर आली नाही.

नवरा आणि बायको यांच्या नात्यात आतापर्यंत नवऱ्याने आपल्या बायकोवर अन्याय, अत्याचार केल्याचं ऐकलं असेल. मात्र आता नवऱ्यासोबत प्रेमसंबंधातून विवाह केलेल्या पत्नीने पतीचा छळ केला आहे.

News Title – Crime News Wife Burns Husband Body cigarette Uttar Pradesh Police Arrested

महत्त्वाच्या बातम्या

“..तर बॉलिवूडला कायमचा रामराम करेन”; कंगना रनौतची मोठी घोषणा

‘आता आमचं ऐका, आता ही खिंड आम्हालाच लढू द्या’; ‘या’ नेत्याची पोस्ट व्हायरल

“निलेश लंकेजवळ मायबाप जनता, तुम्हारे पास क्या है?”; अमोल कोल्हेंचं जबरदस्त भाषण

“फडणवीसांची गांडू शिवसेना काय करते?”, संजय राऊत संतापले

काळजी घ्या! ‘या’ जिल्ह्यांवर सूर्य आग ओकणार; हवामान विभागाचा इशारा