‘पुण्यात कमळच, मोदींसाठी मोहोळच’; योग्य लाईनवर सुरु असलेल्या प्रचारानं भाजपचं पारडं जड

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune loksabha 2024 | गेल्या काही वर्षात पुण्याच्या राजकारणानं अनेक वळणं घेतली. 2019 ला खासदार बनल्यापासून गिरीश बापटांची तब्येत ढासळत जाऊन दुर्दैवानं त्यांचं 2023 साली निधन झालं. गिरीश बापटांनंतर पुण्याचा हा गड, कुणाच्या खांद्यावर सोपवायचा? हा प्रश्न भाजपसमोर होता. मात्र अनेक नेते या जागेवर लढण्यास इच्छूक होते. यातलं सर्वात पहिलं आणि सर्वांच्या पसंतीचं नाव होतं मुरलीधर मोहोळ यांचं…. मुरलीधर मोहोळ हे नेहमीच देवेंद्र फडणवीसांच्या गुड बुक मध्ये राहिलेले नेते आहेत. अखेर पक्षातील नाराजी नाट्ट्यानंतर भाजपकडून पुणे लोकसभेसाठी (Pune loksabha 2024) मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

तसं पाहायला गेलं, तर मुरलीधर मोहोळ हे नाव पुण्यासाठी नवीन नाहीये. पुण्यात मुरलीअण्णा हे नाव प्रत्येकाच्या ओठांवर, एकदा तरी आलं असेलच.  पुणे महानगरपालिकेचे सभासद म्हणून मोहोळ 2002 पासून सलग चार वेळा निवडून येतायेत. 2019 मध्ये मोहोळांना महापौर करण्यात आलं. त्यामुळे पुण्याचे महापौर ते लोकसभेचा उमेदवार, असा त्यांचा राजकीय आलेख राहिलेला आहे. पुण्यात कोरोनाची महामारी असताना मोहोळ जनतेत उतरलेले पहायला मिळाले, त्यावेळी पुण्यातील कोरोना परिस्थिती त्यांनी उत्तमरित्या हाताळली होती.

योग्य लाईनवर मोहोळांचा प्रचार-

भाजपकडून मुरलीधर मोहोळ तर दुसरीकडे काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. अखेर काँग्रेसकडून कसब्यातील जायंट कीलर रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली. भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा विधानसभा मतदारसंघ काबिज करून धंगेकर हिरो ठरले होते, त्याच रवींद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar) लोकसभेची उमेदवारी देऊन पुन्हा तसाच चमत्कार घडू शकतो, ही अपेक्षा काँग्रेस पक्षाला असल्याचं दिसतंय. मात्र ‘पुण्यात कमळच, मोदींसाठी मोहोळच’ या योग्य लाईनवर सुरु असलेल्या प्रचारानं भाजपचं पारडं जड असल्याचं दिसतंय.

पुण्यात 2014 आणि 2019 या सलग लोकसभा निवडणुकांमध्ये (Pune loksabha 2024) भारतीय जनता पक्षाने (BJP) विक्रमी मताधिक्याने विजय मिळवलेत. या लोकसभा निवडणुकीत हे ट्रॅक रेकॉर्ड पुढे नेऊन हैट्रिक करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं दिसतंय. भाजपने शहरी मतदारांना आकर्षित करण्यावर जोर दिलाय. मोदींची शहरी मतदारांमध्ये असलेली क्रेझ भाजपने कॅच करत ‘पुण्यात कमळच, मोदींसाठी मोहोळच’ अशा टॅगलाईन खाली मोहोळांचा जोरदार प्रचार चालू आहे. या मतदारसंघात 100 टक्के शहरी भाग, सुशिक्षित मतदारांचा टक्का जास्त आहे. यातील बहुतांश मतदारांचा नरेंद्र मोदींकडे असलेला ओढा आणि त्यांना आपल्या बाजूने ठेवण्यासाठी भाजपने पुण्यात मोदींच्या नावाचा पुरेपुर वापर चालवेला दिसतोय.

मोरेंचा फटका धंगेकरांनाच-

पुणे लोकसभा निवडणुकीत (Pune loksabha 2024) जिंकण्याचं मोठं आव्हान दोन्ही उमेदवारांसमोर असणार आहे. कारण शहरात असलेला संपर्क आणि प्रतिमा जपण्याचं आणि ती प्रतिमा तशीच कायम ठेवणं त्यांच्यासाठी महत्वाचं असणार आहे. खरंतर पुण्यात मैदान एक आणि खेळाडू तीन अशी स्थिती आहे, मात्र तिसरा खेळाडू पाहिजे तेवढा प्रभाव टाकताना दिसत नाही. मनसेतून बाहेर पडत वंचितकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले वसंत मोरे, मात्र कधी साईडलाईन झाले हे कोणाला कळलंही नाही. कारण वसंत मोरे फक्त सोशल मीडियावरील प्रचारावर भर देत आहेत. निवडणूक नेहमी ग्राऊंडवर लढवली जाते आणि सोशल मीडिया वगैरे त्यासाठी वापरायची साधनं असतात, मात्र मोरेंना त्याचा विसर पडलेला दिसतो, त्यामुळे त्यांनी प्रचाराची सारी मदार फक्त सोशल मीडियावर ठेवली आहे. मोरेंच्या असण्याचा फायदा आहे तो फक्त आणि फक्त मुरलीधर मोहोळ यांना… पूर्वाश्रमीचे धंगेकर यांचे सहकारी असलेले मोरे धंगेकर यांचीच मतं खातील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

पुण्याचा नवा कारभारी बनण्याकडे वाटचाल-

मोहोळांनी सुरुवातीपासून प्रचारात घेतलेली आघाडी अजून तरी टिकून असलेली दिसतेय. सुरुवातीला रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला होता. मोहोळांना विविध मुद्द्यांवर गुंतून ठेवण्याचा प्रयत्न झाला, मात्र हुशार मोहोळांनी ते बरोबर हेरलं आणि ते पुन्हा धंगेकरांच्या जाळ्यात आले नाहीत. मोहोळांनी धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, कुस्ती स्पर्धा आणि विविध पक्षाचे राजकीय मेळावे आयोजित केले. शहरात आपल्या नावाला आधीच प्राप्त असलेलं वलय वापरुन आपल्या प्रचाराचा धडाका लावला, त्याच मोदींच्या प्रतिमेचा मोठा वापर केला. ‘पुण्यात कमळच, मोदींसाठी मोहोळ’च ही टॅगलाईन लोकांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवलं. आता पुण्याची निवडणूक निर्णायक वळणावर असताना मोहोळांची आघाडी तोडण्याचं मोठं आव्हान धंगेकरांसमोर असणार आहे, जे सध्याच्या घडीला तरी अशक्य वाटत आहे. पुण्याचा नवा कारभारी बनण्याकडे मुरलीधर मोहोळ यांची वाटचाल सुरु झाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या- 

येत्या सहा दिवसांत ‘या’ राशींचे नशीब पालटणार; संपत्तीत होणार चिक्कार वाढ

“मी देवघरातील मुर्त्या फेकल्या….”; प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा

“..तर बॉलिवूडला कायमचा रामराम करेन”; कंगना रनौतची मोठी घोषणा

‘आता आमचं ऐका, आता ही खिंड आम्हालाच लढू द्या’; ‘या’ नेत्याची पोस्ट व्हायरल

“निलेश लंकेजवळ मायबाप जनता, तुम्हारे पास क्या है?”; अमोल कोल्हेंचं जबरदस्त भाषण