क्रिकेट खेळणं जीवावर बेतलं, पुण्यात पीचवर घडलेल्या प्रकाराने खळबळ

Pune News | सध्या लहान मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत. लहान मुलं सुट्टीचा आनंद घेत आहेत. अशातच सध्या आय़पीएलचा सीजन सुरू आहे. सर्वांचं लक्ष आय़पीएलकडे लागलं आहे. लहान मुलं देखील आयपीएलचे चाहते आहेत. क्रिकेट कोणाला आवडत नाही असं नाही. क्रिकेट खेळ हा प्रत्येकाला आवडतो. मात्र क्रिकेट खेळ खेळणं एका लहान मुलासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी काळा दिवस ठरला आहे.

पुण्यात (Pune News) क्रिकेट खेळत असताना एका लहान मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर चेंडू लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीये. त्या मुलाचं नाव हे शौर्य आहे. त्याचं वय हे 11 वर्षे आहे. तो पुण्यातील  (Pune News) लोहगाव येथील जगदगुरू अॅकॅडमीमध्ये खेळायला जायचा. त्यावेळी गुरूवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

मारलेला चेंडू शौर्यच्या प्रायव्हेट पार्टला लागला

शौर्यने समोरील फलंदाजाला चेंडू टाकला. त्यावेळी समोर खेळत असलेल्या मुलाने जोरदार फटका मारला. तेव्हा त्याने मारलेला फटका हा शौर्यच्या प्रायव्हेट पार्टला लागला. हा आघात एवढा जोरात होता की शौर्य जागीच कोसळला. तो पुन्हा उठला नाही.  (Pune News)

नेमकं काय घडलं?

ही दुर्देवी घटना पुण्यातील  (Pune News) लोहगाव येथे घडली होती. शौर्य त्याच्या मित्रांसोबत पुण्यातील जगदगुरू अॅकॅडमीत खेळायला जायचा. घडलेल्या घटनेदिवशी तो रात्री उशीरापर्यंत खेळत होता. मात्र याचदिवशी त्याच्यासोबत आणि त्याच्या कुटुंबासोबत अनर्थ घडला. चेंडू प्रायव्हेट पार्टवर लागल्यानंतर त्याला फार वेळ उठता आलं नाही. तिथे इतर काही मुलं जमा झाली. त्यांना काही कळालं नाही. शौर्यला त्यावेळी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र तोवर उशीर झाला होता.

डॉक्टरांनी मुलाचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. आपल्या मुलाच्या जाण्याने कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. याप्रकरणी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात दाखल करण्यात आला होता. मात्र याचं कारण अद्यापही समोर आलं नाही.

शवविच्छेदनासाठी मृतदेह रूग्णालयात दाखल करण्यात आला. खरे कारण अद्यापही समोर आले नाही. मात्र य़ाबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

News Title – Pune News 11 year Boy Playing Cricket During Ball Hit On His Privat Part

महत्त्वाच्या बातम्या

मी काय पाकिस्तान किंवा बांगलादेशातून आलीय का?, मराठा समाजाच्या विरोधामुळे पंकजा मुंडे संतापल्या

तुमचे रक्त माझे चित्र काढण्यासाठी सांडण्यापेक्षा… फडणवीसांचा कार्यकर्त्याला मोलाचा सल्ला

शरद पवार यांची तब्येत बिघडली, डॅाक्टरांनी दिला हा महत्त्वाचा सल्ला

पुढील दोन दिवसात ‘या’ दोन राशींना प्रचंड धनलाभ होईल

राहा कपूरची चाचूसोबत फुल्ल धम्माल-मस्ती; क्युट व्हिडीओ तूफान व्हायरल

 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .