विवाह, गृहप्रवेश ते नामकरण..मे महिन्यात शुभ मुहूर्त किती आणि कधी?; जाणून घ्या संपूर्ण यादी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

May 2024 Shubh Muhurat | हिंदू धर्मात मुहूर्ताला अधिक महत्व असते. कोणतेही कार्य करताना शुभ महूर्त बघूनच केलं जातं. या काळात देवी-देवतांचा आशीर्वाद मिळतो, अशी मान्यता आहे. एप्रिल महिना संपण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक आहेत. आता मे  महिना सुरू होईल. या महिन्यात शुभ-अशुभ मुहूर्त कधी आणि किती आहेत, याबाबत या लेखात सविस्तर माहिती दिली आहे.

मे महिन्यातील शुभ मुहूर्त

सर्वार्थ सिद्धी योग : हा योग सर्वांत शुभ मानला जातो. मे महिन्यात 05, 07, 08, 13, 14, 19, 23, 24 आणि 26 तारखेला सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे.

अमृत ​​सिद्धी योग : ज्योतिष शास्त्रात हा योग शुभ मानला गेला आहे. मे महिन्यात 7 आणि 19 मे रोजी अमृत सिद्धी योग तयार होत आहे.

वाहन व मालमत्ता खरेदीसाठी शुभ मुहूर्त : मे महिन्यात जर तुम्ही नवीन वाहन किंवा जागा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात काही शुभ दिवस आहेत. या दिवशी खरेदी केली तर फायद्याचा सौदा ठरू शकतो. 01, 03, 05, 06, 10, 12, 13, 19, 20, 23, 24, 29 आणि 30 मे हे दिवस खरेदीसाठी उत्तम आहेत.

घर खरेदीसाठी शुभ दिवस : 03,04, 12, 13, 17, 22,23 आणि 24 मे हे दिवस घर खरेदीसाठी शुभ मानले जातात. या दिवशी तुम्ही नवीन घर खरेदी करू शकता. यामुळे तुमच्या आयुष्यात शुभ घडामोडी घडतील. तुमच्या घरात लक्ष्मी नांदेल. तुम्हाला फायद्याचा सौदा होऊ शकतो.

नामकरण मुहूर्त : 01, 03, 05, 09, 10, 13, 19, 20, 23, 24, 27 आणि 30 मे हे दिवस नामकरणाच्या विधीसाठी शुभ असणार आहेत. या दिवशी तुम्ही नामकरण विधी करू शकता.

मुंडन मुहूर्त : 03, 10, 24, 29 आणि 30 मे हे मुंडन संस्कारासाठी उत्तम दिवस असतील.दरम्यान, मे महिन्यात विवाह आणि गृह प्रवेश करण्याचे शुभ मुहूर्त नाहीत.

News Title : May 2024 Shubh Muhurat

महत्त्वाच्या बातम्या –

12 हजारांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करा Samsung चा लेटेस्ट 5G स्मार्टफोन; जाणून घ्या ऑफर्स

तुम्ही खात असलेलं तूप शुद्ध आहे की अशुद्ध?, ‘या’ टिप्समुळे फसवणूक टळू शकते

राहुल गांधीचं भवितव्य आज ठरणार; देशातील 88 मतदारसंघात मतसंग्राम

‘या’ भागावर अवकाळी पावसाचं संकट कायम; यलो अलर्ट जारी

‘या’ राशीच्या लोकांना व्यवसायात दुप्पट फायदा होईल!