…त्या वक्तव्यावरून अजितदादांना दिलासा तर शरद पवार गटाला झटका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar l सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच या निवडणुकीत बारामती मतदार संघ चांगलाच चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण तुफान व्हायरल झालं होत. अजित पवारांनी या भाषणांमधून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला, मात्र ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.

उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटण कचाकचा दाबा : अजित पवार

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या इंदापूरमधील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकास निधी हवा असेल तर उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटण कचाकचा दाबा, अन्यथा विकासनिधी देताना आपला हात आखडेल अस वक्तव्य केल होत.

मात्र अजित पवार यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला होता. यासंदर्भात शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांच्याकडून करण्यात आली आहे. मात्र प्राथमिक चौकशीत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात कोणत्याही उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव घेण्यात आले नव्हते. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग ठरत नसल्याचं कविता द्विवेदी यांनी सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आल आहे.

Ajit Pawar l चौकशी करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये केलेल्या भाषणात आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपातून त्यांना निवडणुक आयोगाकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाला देखील त्याची एक प्रत पाठवण्यात आली आहे.

शरद पवार गटाने घेतलेल्या आक्षेपावर उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारलं असता ते म्हणाले की, चौकशी करण्याचा अधिक हा पूर्णपणे निवडणूक आयोगाचा आहे. बारामती येथील मेळाव्यात अजित पवारांनी भाषणात म्हटलं की, येत्या निवडणुकीत मी महायुतीचा धर्म पाळणार हा माझा शब्द आहे. आचार संहितेचे जे काही नियम असतात ते पाळायचे असतात अशा शब्दांत अजित पवारांनी त्यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे.

News Title : Ajit Pawar Clean Chit

महत्त्वाच्या बातम्या –

बारावीच्या निकालाआधी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

‘मला सिगारेट ओढायला प्रचंड आवडतं, दिवसाला..’, विद्या बालनचा चकित करणारा खुलासा

विवाह, गृहप्रवेश ते नामकरण..मे महिन्यात शुभ मुहूर्त किती आणि कधी?; जाणून घ्या संपूर्ण यादी

12 हजारांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करा Samsung चा लेटेस्ट 5G स्मार्टफोन; जाणून घ्या ऑफर्स

तुम्ही खात असलेलं तूप शुद्ध आहे की अशुद्ध?, ‘या’ टिप्समुळे फसवणूक टळू शकते