‘या’ बड्या नेत्याचा शिंदेसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Shinde l लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार झटका दिला आहे. करमाळ्याचे शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार नारायण पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे महायुती सरकारला मोठा धक्का बसणार आहे.

शरद पवारांचा शिंदेसेनेला मोठा झटका :

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सातत्याने महायुती सरकारला जोरदार झटके देत आहे. शिवसेना शिंदे गटाचा माजी आमदार नारायण पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. माजी आमदार नारायण पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

याशिवाय माजी आमदार नारायण पाटील यांच्या सोबत करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती ,माजी पंचायत समीती सदस्य, माजी जि.प.सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व गावोगावचे सरपंच यांचे सर्व पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. तसेच नारायण पाटील यांचा पक्षप्रवेश सोहळा हा करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संपन्न होणार आहे.

या पक्षप्रवेशाला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील दिग्गज पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Eknath Shinde l नारायण पाटील शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार :

माजी आमदार नारायण पाटील हे करमाळा तालुक्यातील वजनदार नेते आहेत. नारायण पाटील हे 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून करमाळा विधानसभा मतदारसंघातून उभे होते. 2009 झाली त्यांनी जनसुराज्य पक्षाकडून निवडणूक लढवली देखील होती.

तसेच 2014 ला शिवसेनेकडून निवडणूक लढवत ते आमदार झाले होते. मात्र सन 2019 ला शिवसेनेने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवुन देखील त्यांना मोठे मतदान मिळाले होते . मात्र त्यांनी आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

News Title : Loksabha Election Shivena Eknath shinde Ex Mla Narayan Patil Join ncp

महत्त्वाच्या बातम्या –

…त्या वक्तव्यावरून अजितदादांना दिलासा तर शरद पवार गटाला झटका

बारावीच्या निकालाआधी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

‘मला सिगारेट ओढायला प्रचंड आवडतं, दिवसाला..’, विद्या बालनचा चकित करणारा खुलासा

विवाह, गृहप्रवेश ते नामकरण..मे महिन्यात शुभ मुहूर्त किती आणि कधी?; जाणून घ्या संपूर्ण यादी

12 हजारांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करा Samsung चा लेटेस्ट 5G स्मार्टफोन; जाणून घ्या ऑफर्स