स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; यूपीएससी अंतर्गत तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती सुरु

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

UPSC Recruitment 2024 l स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) मध्ये 506 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. त्यामुळे आता देशातील कित्येक तरुणांचं स्वप्न साकार होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवार UPSC CAPF 2024 साठी आयोगाच्या upsconline.nic.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 14 मे 2024 असणार आहे. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

पात्रता आणि निकष आणि पदसंख्या :

आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या वन टाइम रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्मवर जाऊन अर्जदाराने प्रथम स्वत:ची नोंदणी करणे आवश्यक आहे. यानंतर परीक्षेसाठी अर्ज भरता येणार आहे. जर उमेदवाराने आधीच नोंदणी केलेली असल्यास तो थेट अर्ज करू शकतो.

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी. यासोबतच उमेदवाराचे किमान वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि कमाल वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाईल. 1 ऑगस्ट 2024 ही तारीख लक्षात घेऊन वयाची गणना केली जाणार आहे.

सीमा सुरक्षा दल (BSF): 186 जागा
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF): 120 जागा
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF): 100 रिक्त जागा
इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP): 58 रिक्त जागा
सशस्त्र सीमा बल (SSB): 42 रिक्त जागा

UPSC Recruitment 2024 l अर्ज कसा करायचा

– या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी प्रथम upsc.gov.in या अधिकृत वेबसाइट भेट द्या.
– त्यानंतर वेबसाइटच्या होम पेजवर What’s New या सेक्शन विभागात जा. त्यानंतर भरती सूचना या पर्यायावर क्लिक करा.
– आता पुढील पेजवर Click here या पर्यायावर क्लिक करून पुढे जा.
– आता तुम्हाला नवीन नोंदणी लिंकवर क्लिक करून प्रथम नोंदणी करावी लागेल.
– यानंतर तुम्हाला इतर तपशील भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
– शेवटी उमेदवाराला अर्ज शुल्क जमा करावा लागेल. त्यानंतर अर्ज सबमिट करावा.

News Title : UPSC Recruitment 2024

महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ बड्या नेत्याचा शिंदेसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र

…त्या वक्तव्यावरून अजितदादांना दिलासा तर शरद पवार गटाला झटका

बारावीच्या निकालाआधी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

‘मला सिगारेट ओढायला प्रचंड आवडतं, दिवसाला..’, विद्या बालनचा चकित करणारा खुलासा

विवाह, गृहप्रवेश ते नामकरण..मे महिन्यात शुभ मुहूर्त किती आणि कधी?; जाणून घ्या संपूर्ण यादी