मध्यरात्री बारामतीत पडला पैशांचा पाऊस; रोहित पवारांनी केला व्हिडीओ शेअर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Loksabha l गेल्या महिन्यापासून सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. अशातच आज राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील 11 जागांसाठी मतदानाला सुरवात झाली आहे. या तशीच्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण या मतदारसंघात नणंद- भावजय मध्ये चुरशीची लढत होणार आहे. अशातच आता काल मध्यरात्री बारामतीत विरोधकांकडून मतदाराना पैसे वाटल्याचा आरोप केला आहे.

रोहित पवारांनी केला व्हिडीओ शेअर :

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामतीचे शहराध्यक्ष यांनी विरोधकांकडून मतदाराना पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. बारामती शहरातील आमराई, मुजावर वाडा परिसरात पैसे वाटून मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न अजित पवार गटाने केला आहे. तसेच दमदाटी व दादागिरी करून मतदान करण्यास प्रोत्साहन केल्याचा आरोप शहराध्यक्षांनी केला आहे.

याशिवाय भोर तालुक्यात एका गावात रात्री पैशांचं वाटप झाल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला आहे. यासंदर्भात रोहित पवारांनी एक्स पोस्टवर व्हिडिओ शेअर करत पैसे वाटप झाल्याचा आरोप केला आहे.

Baramati Loksabha l दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झाली बाचाबाची :

मध्यरात्री भोर तालुक्यातील एका गावात रात्री पोलिस बंदोबस्तात करून पैशांचे वाटप होत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. तसेच पैसे वाटणारे लोक अजित दादा मित्रमंडळाचे कार्यकर्ते असल्याचा दावा रोहित पवारांकडून करण्यात आला आहे. या आरोपानंतर काही वेळासाठी भोर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच ज्या वाहनातून पैसे वाटल्याचा आरोप केला जात आहे त्या वाहनाच्या काचा देखील फोडण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच संशयीत वाहनामध्ये घड्याळ चिन्हाचे प्रचार करणारे काही साहित्य आढळल्याने खळबळ उडाली आहे.

या सर्व प्रकारामुळे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे. परंतु पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तसेच संतप्त कार्यकर्त्यांकडून विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचे खिसे आणि वाहने तपासणी करण्याची मागणी करण्यात आली होती. याशिवाय एवढ्या मध्यरात्री गावात तुमचे काम काय आहे? अशी ग्रामस्थांकडून विचारणा देखील करण्यात आली आहे.

News Title – Baramati Lok Sabha Election

महत्त्वाच्या बातम्या

धाकधूक वाढली! तिसऱ्या टप्प्यातील ‘या’ दिग्गजांचे भवितव्य ठरणार; कोण बाजी मारणार

आज ‘या’ राशींना मिळेल सुखाचा गारवा; बक्कळ पैशांसह प्रेमप्रकरणात मिळेल यश

ठाण्यातील राजकारण तापलं; राजन विचारेंचा नरेश म्हस्केंबाबत मोठा गोप्यस्फोट

जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावणार मुरलीधर मोहोळ

क्रिकेट खेळणं जीवावर बेतलं, पुण्यात पीचवर घडलेल्या प्रकाराने खळबळ