Shriya Pilgaonkar Adoption | मराठी मनोरंजनसृष्टीतील 90 चा काळ गाजवणारे अभिनेते सचिन पिळगावकर आणि पत्नी सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रियासुद्धा अभिनय क्षेत्रामध्ये आहे. एकुलती एक मराठी चित्रपटामध्ये काम करत मराठी सिनेसृष्टीमध्ये पाऊल टाकलं. त्यानंतर तिने बॉलिवूडसह ओटीटीवरील काही सिरिजमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. श्रिया इतर अभिनेत्रीप्रमाणे फर चर्चेत नसचे. मात्र ती पहिल्यांदा एका गंभीर विषयाला धरून चर्चेत आलीये. (Shriya Pilgaonkar Adoption)
गेल्या काही वर्षांपासून श्रिया पिळगावकरला सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी दत्तक (Shriya Pilgaonkar Adoption) घेतल्याबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. तिला अनेकदा याबाबत विचारलं असता, ती फार कधी काही बोलताना दिसली नाही. मात्र आता तिने सर्व प्रश्नांना उत्तर देत पूर्णविराम दिलाय. श्रियाने नेमकं काय म्हटलं आहे ते जाणून घेऊयात. (Shriya Pilgaonkar Adoption)
“जात प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाहीये”
माध्यमांसोबत मुलाखतील बोलत असताना श्रिया पिळगावकरने आपण आपल्या आई बाबांचे दत्तक नसल्याचं सांगितलं आहे. “एका वर्तमानपत्रामध्ये मी दत्तक कन्या असल्याची बातमी आली होती. मात्र ती पूर्णपणे खोटी होती. मी माझ्या आई वडिलांची दत्तक कन्या नाहीये. मी यावर काहीतरी स्पष्टीकरण द्यावं खरं तर सहसा हा विषयच नाहीये. याबाबत स्पष्टीकरण द्यावं याचीही गरज नाही. मी माझं जात प्रमाणपत्र दाखवण्यासाठी इंस्टाग्रामवर शेअर करणार नाहीये. मात्र लोकांच्या शंकेचं निरसन व्हावं. ही बातमी खरी नसली तरीही हास्यास्पद आहे,” असं श्रिया पिळगावकर म्हणाली.
श्रिया पिळगावकर चित्रपट
श्रिया पिळगावकरने सुरूवातीला मराठी आणि फ्रेंचमध्ये काम केलं. मराठीतील एकुलती एक या चित्रपटातून तिनं आपल्या अभिनयाचा ठासा उमटवला तो ओटीटीपर्यंत उमटला गेला. मराठीनंतर तिने 2016 रोजी बॉलिवूड किंग खान शाहरूखसोबत फॅन या चित्रपटातून स्क्रिन शेअर केली होती. 2018 मध्ये मिर्जापूर य गाजलेल्या सिरिजमध्ये तिनं काम केलं होतं. (Shriya Pilgaonkar Adoption)
2019 रोजी श्रियाने ‘बिचम हाऊस’ या टेलिव्हिजन सीरिजमध्ये काम केलं होतं. 2021 हाथी मेरे साथी या चित्रपटात काम केलं तो चित्रपट, तेलगु, तमिळ आणि हिंदीत भाषेत प्रदर्शित झाला.
Shriya Pilgaonkar Adoption
महत्त्वाच्या बातम्या-
विवाह, गृहप्रवेश ते नामकरण..मे महिन्यात शुभ मुहूर्त किती आणि कधी?; जाणून घ्या संपूर्ण यादी
12 हजारांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करा Samsung चा लेटेस्ट 5G स्मार्टफोन; जाणून घ्या ऑफर्स
तुम्ही खात असलेलं तूप शुद्ध आहे की अशुद्ध?, ‘या’ टिप्समुळे फसवणूक टळू शकते
राहुल गांधीचं भवितव्य आज ठरणार; देशातील 88 मतदारसंघात मतसंग्राम