अजित पवारांची दमबाजी सुरुच… “तुझा असा कंड जिरवेन की”; भरसभेत निलेश लंकेंना दिला दम

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी ओळखले जातात, मात्र अलिकडच्या काळात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी आपल्या विरोधात गेलेल्या नेत्यांना जाहीर सभांमधून दम द्यायला सुरुवात केली आहे. आता अशाच दम दिलेल्या नेत्यांमध्ये एक नाव आणखी जमा झालंय ते म्हणजे नगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचं… नगरमध्ये जाऊन अजित पवार यांनी थेट निलेश लंके (Nilesh Lanke) यांनाच दम दिला आहे.

‘माझ्या नादी लागलास तर तुझा असा कंड जिरवेन, की सगळीकडे तुला अजित पवारच दिसेल.’, असं अजित पवार म्हणाले आहेत. अहमदनगरमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ सभेत अजित पवारांनी निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली. भरपावसात भाषण करत अजित पवार यांनी निलेश लंके यांच्यावर टीकेची झोड उठवली.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बरोबर बंदोबस्त केलाय, मग तू किस झाड की पत्ती है?, असं म्हणत अजित पवार यांनी निलेश लंके (Nilesh Lanke) यांना इशारा दिला. ‘अरे निलेश बेटा, तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे. तू जर माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या आणि मी जर तुझ्या मागे लागलो तर, आमच्या ग्रामीण भागात एक शब्द आहे कंड जिरवतो, तुझा असा कंड जिरवेन की तुला फक्त अजित पवारच दिसतील.’, अशा शब्दांत अजित पवार (Ajit Pawar) यांनी निलेश लंके यांना इशारा दिला आहे. यापूर्वी देखील पवारांनी दमदाटी केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. आता पुन्हा अजित पवारांनी त्यांना दम दिला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, गडी दिसायला बारीक दिसतो, पण लय पोहोचलेला आहे. मला एकदा घरी घेऊन गेला. कसं साधं घर आहे, कसे साधे आई-वडील आहेत हे सांगितलं. आमदार झाल्यावर त्याची एक एक लक्षण समोर आली. अधिकाऱ्यांना देखील धमक्या देत होता. आम्ही उपमुख्यमंत्री असूनही जिल्हाधिकाऱ्यांशी व्यवस्थित बोलतो आणि हा पठ्ठ्या पोलिसांनाही तुमचा बाप येतोय, अशी धमकी देतो. वाटलं नव्हतं बाबा असे दिवे लावेल, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

“…शिंगावर घेतल्याशिवाय स्वस्थ बसू नका”

“आता तो आमदार नाही. त्यामुळे त्याची अरेरावी आता अधिकाऱ्यांनी सहन करू नये. कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेतल्याशिवाय स्वस्थ बसू नका. निवडणूक आयोगाला सुद्धा पारनेरमध्ये जास्त बंदोबस्त देण्याची आम्ही मागणी करणार आहोत”, असंही अजित पवार म्हणाले.

‘लोकसभा निवडणुकीत या निलेशचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा. अजूनही कोणी दहशतीत असेल तर त्याला जाऊन सांगा अजित पवार आला होता व तो आपल्या पाठीशी आहे. तुम्ही अजिबात घाबरू नका, महायुती आता तुमच्या पाठीशी आहे’, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

News Title – Ajit Pawar warning to Nilesh Lanke

महत्त्वाच्या बातम्या-

एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना मोठा दिलासा; आधी जन्मठेपेची शिक्षा आता…

…म्हणून लोक लग्नानंतरही प्रेमप्रकरणात अडकतात; ‘ही’ आहेत कारणं

रवींद्र वायकरांना अडचणीत आणण्यासाठी ठाकरेंनी आखला मोठा डाव; थेट….

सलमान लग्न कधी करणार?; मिथुन चक्रवर्तींनी केला मोठा खुलासा

अरविंद केजरीवालांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, तिहार जेलमधून बाहेर येणार