रवींद्र वायकरांना अडचणीत आणण्यासाठी ठाकरेंनी आखला मोठा डाव; थेट….

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ravindra Waikar | काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले नेते रवींद्र वायकर यांनी सर्वांत मोठा गौप्यस्फोट करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. शिंदे गटात गेल्यानंतर रवींद्र वायकर यांना थेट लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. ते उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत.

या मतदार संघात ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना हा दुप्पट धक्का दिलाय. आता उद्धव ठाकरे यांनी आपली राजकीय चाल खेळली आहे. ठाकरे यांनी थेट रवींद्र वायकर यांना अडचणीत आणण्याची तयारी केलीये.

वायकर यांना ठाकरे गटाकडून नोटीस

ठाकरे गटाकडून वायकर यांना अपात्रता बाबत नोटीस बजावण्यात आली आहे. रवींद्र वायकर हे ठाकरे गटाचे आमदार आहेत तसेच ते शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार देखील आहेत, त्यामुळे तुम्हाला अपात्र का करू नये?,अशी नोटीस ठाकरे गटाने वायकर यांना पाठवली आहे. दुसरीकडे वायकर यांनी आपल्यावर केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच पलटवार करत आरोप केले आहेत. तुमच्या गटात असताना मला वाचवलं का नाही?, असा सवाल वायकर यांनी केला आहे.

माझ्यावर करण्यात आलेले आरोप अत्यंत खोटे असून हे आरोप त्या वेळेलाही होत होते. मात्र आता मी विरोधात उभा आहे. जेव्हा मला वाचवायला पाहिजे होतं त्यावेळेला वाचवले गेले नाही. मी विरोधक म्हणून उभा आहे. आमची सत्ता येईलच, त्यातून काम करण्यासाठी मी उभा आहे, असं रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंनी वाढवल्या वायकरांच्या अडचणी

दरम्यान, शिवसेना जेव्हा फुटली होती तेव्हा रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या गटातच होते मात्र महिन्याभरापूर्वीच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. दुसरीकडे त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माझ्यावर दबाव टाकण्यात आल्याचं म्हटलं आहे .

“खोट्या प्रकरणात मला अडकवण्यात आलं. एक तर तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे असे दोनच पर्याय माझ्यासमोर होते. त्यामुळे मी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला.”, असं रवींद्र वायकर यांनी म्हटलं आहे. आता ठाकरे गटाकडून त्यांच्या आमदारकीच्या अपात्रते बाबत नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणुकीनंतर त्यांच्यावर आमदारकीच्या पात्रतेची कारवाई करण्यात यावी यासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

News Title :  Thackeray Group Notice To Mla Ravindra Waikar

महत्त्वाच्या बातम्या-

शाहरुखच्या लाडक्या लेकीची बिग बींच्या नातवासोबत नाईट आऊट, व्हिडीओ तूफान व्हायरल

अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का, विश्वासू आमदार लागले शरद पवार गटाच्या प्रचाराला!

शिरूरच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय!

‘आमच्या सोबत या’ म्हणत मोदींकडून ऑफर, पवार म्हणाले ‘हे माझ्याचानं होणार नाही’

‘ही शेवटची संधी आहे तुम्हाला’; जरांगेंचं नेत्यांना धडकी भरवणारं वक्तव्य