शाहरुखच्या लाडक्या लेकीची बिग बींच्या नातवासोबत नाईट आऊट, व्हिडीओ तूफान व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Suhana Khan | बाॅलिवूडचा बादशाह कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असतो. आपल्या अभिनयाने त्याने लाखो लोकांच्या मनात घर केलं आहे. आज सुद्धा शाहरुख खानच्या अभिनयाची, तसेच त्याच्या नवनवीन लूकची चर्चा होत असते. फक्त शाहरुख नाहीतर त्याची लेक सुहाना खानची देखील जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. एवढंच नव्हे तर गेल्या काही दिवसांमध्ये सुहाना खान बिग बी यांचा नातू अगस्त्य नंदा याला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, सध्या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

काय आहे प्रकरण?

सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफोर्म आहे ज्यावर कधीही काहीही व्हायरल  होऊ शकतं. अशातच शाहरुख खानच्या लेकीचा रात्री उशीराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ती अगस्त्य नंदा याच्यासोबत दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुहाना खान (Suhana Khan) आणि अगस्त्य ऐकमेकांना डेट करत आहेत. मात्र, दोघांनीही अद्याप कसलाही खुलासा केलेला नाहीये. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सुहाना खान (Suhana Khan) अगस्त्य बरोबर रात्री उशीरा पापाराझीच्या कॅमेरामधून कैद झाली होती. या व्हिडीओमध्ये अगस्त्य रात्री उशिरा त्याच्या घरी जाताना दिसतोय. त्याच्यासोबत असलेली मुलगी ही सुहाना खान असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडीओमध्ये सुहानाचा चेहरा दिसत नाहीये. कारण सुहाना लगेच अगस्त्यच्या मागोमाग निघून आतमध्ये जाते.

दोघांनी केला डान्स-

मुंबईत काही दिवसांपूर्वी ‘द अर्चिस’ सिनेमाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सुहाना आणि अगस्त्य यांनी डान्स केला. दोघांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सुहाना आणि अगस्त्य अनेकांना आवडला, तर काही नेटकऱ्यांनी मात्र सुहाना खानवर निशाणा साधला आहे.

News Title : Suhana khan and agasatya nanda

महत्त्वाच्या बातम्या-

शिरुरमध्ये अजित पवारांचा सभांवर सभांचा तडाखा, शिवाजी आढळराव पाटलांना पराभवाची भीती?

‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

सावधान! ‘या’ बँकेत तुमचं खातं असल्यास होणार बंद

सर्वात मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवारांना थेट ऑफर

“पक्ष बदलायला कसं भाग पाडलं?”; शिंदे गटात गेलेल्या रवींद्र वायकरांनी सगळं सांगून टाकलं