सर्वात मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवारांना थेट ऑफर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात प्रचारसभा घेत आहे. नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात असून त्यांनी नंदुरबार येथे जनतेला संबोधित केलं. यावेळी बोलताना नरेंद्र मोदींना केलेल्या वक्तव्याची सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे. यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसवर टीका केली. तसेच शरद पवारांना थेट ऑफर देखील दिली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मोदींची शरद पवारांना ऑफर

बारामतीच्या निवडणुकीनंतर शरद पवार चिंतेत आहेत. नकली शिवसेना, NCP ने काँग्रेसमध्ये विलीन होण्याच मन बनवलय, असं नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर टीका केली असली, तरी त्यांना एक ऑफर सुद्धा दिली आहे. शरद पवारांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत एनडीएमध्ये यावं, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील, असं नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणालेत.

4 जूननंतर राजकीय जिवनामध्ये टिकून राहायचं असेल तर छोट्या-छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल, असं त्यांना वाटतं. याचा अर्थ नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेणार आहेत, असं मोदींनी म्हटलंय. मात्र काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत या, अशी ऑफर मोदींनी दिलीये.

काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावं आणि उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत यावं, अशी ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिली आहे. आता यावर ठाकरे आणि पवार यांच्याकडून काय प्रत्युत्तर येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Narendra Modi काय म्हणाले?

“विरोधक मला गाडण्याची भाषा करतात. विरोधक जनतेचा विश्वास हरवून बसले आहेत” अशी टीका त्यांनी केली. भारतीयांवर वर्णभेदी टिप्पणी करणारे काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्यावर नरेंद्र मोदींनी निशाणा साधला. “काँग्रेसचा अजेंड देशासाठी घातक आहे. मी मंदिरात गेल्यावर काँग्रेसला पोटदुखी होते” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

“पक्ष बदलायला कसं भाग पाडलं?”; शिंदे गटात गेलेल्या रवींद्र वायकरांनी सगळं सांगून टाकलं

गुड न्यूज! अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या किंमती

प्रियंका चतुर्वेदींनी भरसभेत केली मोदींची नक्कल, म्हणाल्या…

शेतकऱ्यांनो अशाप्रकारे चेक करा PM किसान योजनेच्या 17 वा हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळणार की नाही?

नरेंद्र दाभोलकर खून खटल्याप्रकरणी न्यायालयाने दिला सर्वात मोठा निकाल!