“पक्ष बदलायला कसं भाग पाडलं?”; शिंदे गटात गेलेल्या रवींद्र वायकरांनी सगळं सांगून टाकलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ravindra Waikar | गेल्या अनेक वर्षांपासून शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर (Ravindra Waikar) हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. मात्र दबाव तंत्राला बळी पडून ते शिंदे गटाच्या शिवसेनेत गेले असल्याचा दावा आता स्वत: रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी केला. एका मुलाखतीत ते बोलत होते. गेली 50 वर्षे मी बाळासाहेबांसोबत होतो, उद्धव ठाकरेंसोबत होतो. मात्र जेव्हा त्यांना सोडलं तेव्हा कुटुंबातील सदस्याला आपण सोडत आहे असं वाटत असल्याचं त्यांनी मुलाखतीत बोलत असताना सांगितलं आहे.

त्यांनी माध्यमांसोबत बोलत असताना त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबाबत सर्वच सांगून टाकलं आहे. नियतीने माझ्यावर जी वेळ आणली आहे तशी वेळ कोणावरही येऊ नये असं ते म्हणाले होते. तसेच माझ्या जड अंतकरणाने मी शिंदे गटात गेलो असल्याचं म्हणाले.

नुकताच एकनाथ शिंदे यांच्या पक्षात त्यांनी प्रवेश केला. त्यांना आता मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून तिकिट देण्यात आलं. त्यांनी बोलत असताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

“एक म्हणजे गजाआड जाणं आणि दुसरं म्हणजे…”

चुकीच्या पद्धतीने मला आणि माझ्या कुटुंबाला गोवण्यात आल्याचं रवींद्र वायकर म्हणाले आहेत. त्यामुळे माझ्यासमोर केवळ दोनच पर्याय होते. एक म्हणजे गजाआड जाणं आणि दुसरं म्हणजे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणं. दबाव तर होताच. मात्र पत्नीचेही नाव गोवण्यात आलं. त्यामुळे माझ्यावर तसा दुसरा पर्याय नव्हता. माझ्यावर नियतीने जी वेळ आणली ती कोणावरही आणू नये, असं वायकर म्हणाले.

पक्ष सोडतानाचा सांगितला भावनिक किस्सा

रवींद्र वायकर हे गेल्या 50 वर्षांपासून बाळासाहेब असल्यापासून शिवसेनेचं त्यांनी शिवबंधन बांधलं आहे. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलो होतो. मला त्यांची साथ सोडावी लागली. एखाद्या कुटुंब सदस्याला सोडून जाताना आपण जसं पारखे होतो. तशीच भावना माझी होती, असं रवींद्र वायकर म्हणाले.

नियतीने माझ्यासमोर असा काही यक्षप्रश्न ठेवला आणि नियतीच कसा बदला घेईल हे आपण पाहिलंच असेल, असं रवींद्र वायकर म्हणाले आहेत. दरम्यान, उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून शिंदे गटाकडून रवींद्र वायकर निवडणूक लढवतील. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता अधिक आहे.

 News Title – Ravindra Waikar Big Statement About Why Leave Uddhav Thackeray Party

महत्त्वाच्या बातम्या

नरेंद्र दाभोलकर खून खटल्याप्रकरणी न्यायालयाने दिला सर्वात मोठा निकाल!

उन्हाळ्यात वॉटर पार्कला जाणार असाल तर ‘या’ चुकांपासून दूर राहा

शिंदे गटात गेलेल्या वायकरांचे गौप्यस्फोट, “माझ्यापुढे जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय होते”

भाजप जिंकल्यास मुस्लिमांचं आरक्षण रद्द करून SC, ST आणि ओबीसींना देऊ; अमित शाहांचं वक्तव्य

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करू शकत नसाल तर या गोष्टी खरेदी करा; पैशांची कमी भासणार नाही