शिंदे गटात गेलेल्या वायकरांचे गौप्यस्फोट, “माझ्यापुढे जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय होते”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

 Ravindra Waikar। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर विरूद्ध उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मात्र शिंदे गटाचे नेते आणि उमेदवार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) हे आमनेसामने लढणार आहेत. अमोल किर्तीकर आणि रवींद्र वायकर (Ravindra Waikar) हे गेली अनेक वर्षांपासून एकाच पक्षात होते. मात्र रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर प्रचंड दडपण आणण्याचं काम केलं जात असल्याचा दावा आता स्वत: वायकरांनी माध्यमांसोबत मुलाखतीत बोलताना व्यक्त केला आहे.

नुकताच रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट केली आहे. शिंदे गटातून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र यामागे मला गोवण्यात आलं आहे. अशी वेळ कोणावरही येऊ नये, असं रवींद्र वायकर  (Ravindra Waikar) म्हणाले आहेत.

“दोनच पर्याय माझ्याकडे होते म्हणून…”

पक्षात जाणे किंवा गजाआढ जाणे असे दोनच पर्याय नियतीने माझ्यासमोर मांडले होते. जड अंतकरणाने मी पक्ष बदलला. दबाव तर होताच…मात्र पत्नीचेही नाव गोवण्यात आलं. नियतीने माझ्यावर जी वेळ आणली होती ती इतर कोणावरही येऊ नये, असं रवींद्र वायकरांनी सांगितलं.

अगदी अलिकडेच त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना उशीरा का होईना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. अशात त्यांनी केलेल्या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे.

“नियतीने यक्षपक्ष निर्माण करून ठेवला”

माझ्या हातातील शिवबंधन हे बाळासाहेब असल्यापासून आहे. धनुष्यबाण देखील माझ्या खांद्यावर होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत राहिल्यानंतर मला 50 वर्षे राहिल्यानंतर मला उद्धवजींची साथ सोडावी लागली. कुटुंबाला आपण पारखे होतो, तशीच माझी भावना होती. मात्र नियतीने माझ्यासमोर यक्षप्रश्न निर्माण करून ठेवला होता, असं ते म्हणाले.

माझी तक्रार ही फौजीदार स्वरूपाची नव्हती. सर्वोच्च न्यायालयापर्यंत दरवाजे ठोठावे लागले. माझे प्रकरण राजकीय असल्याचं मला वकिलांनी सांगितलं आहे. कोणीही मला हमी देत नव्हतं, तसेच माझ्यासमोर दुसरा कोणता पर्याय देखील नसल्याचं रवींद्र वायकर म्हणाले.

News Title – Ravindra Waikar Big Statement About Enter In Shinde Shivsena

महत्त्वाच्या बातम्या

भाजप जिंकल्यास मुस्लिमांचं आरक्षण रद्द करून SC, ST आणि ओबीसींना देऊ; अमित शाहांचं वक्तव्य

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करू शकत नसाल तर या गोष्टी खरेदी करा; पैशांची कमी भासणार नाही

विखे- लंकेंसाठी हे 7 राजकारणी नगरमध्ये धुरळा करणार; विखेंसाठी 4 तर लंकेसाठी 3 सभा होणार

महाराष्ट्राच्या ‘महानंद’वर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा! यामागचं नेमकं कारण काय

या राशीच्या व्यक्तींनी प्रवास टाळावा