या राशीच्या व्यक्तींनी प्रवास टाळावा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Today Horoscope l मेष:- कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. काही प्रमाणात मानसिक तणाव राहील. अति विचारांच्या आहारी जाऊ नये. संपर्कातील लोकांच्या वैचारिकतेचा अति विचार करू नका. शुभ रंग लाल, शुभ अंक ५

वृषभ:- कला क्षेत्रात संधी मिळू शकेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. बाहेर वावरतांना सावध राहावे. नोकरदार व्यक्तींना थोडा दिलासा मिळेल. शुभ रंग निळा, शुभ अंक ८

मिथुन:- मनात विचारांचा गोंधळ माजेल. क्षणिक आनंदाने हुरळून जाऊ नका. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. प्रकृतीच्या बाबत चिकित्सक राहाल. शुभ रंग पांढरा, शुभ अंक १

कर्क:- मानसिक स्थैर्य जपावे लागेल. लहान-सहान गोष्टींचा फार ताण घेऊ नका. सहकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल. वैचारिक थकवा जाणवेल. आज प्रवास टाळावा. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक ८

सिंह:- कौटुंबिक गोष्टींना अधिक प्राधान्य द्यावे. मानसिक चंचलता राहील. ध्यानधारणेत अधिक वेळ घालवा. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका. शुभ रंग नारंगी, शुभ अंक ४

Today Horoscope l कन्या:- मनातील काही आकांक्षा पूर्ण करून घ्या. अधिकारी वर्गाचे उत्तम सहकार्य मिळेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींना चांगला प्रतिसाद मिळेल. कमिशनचा चांगला लाभ मिळेल. शुभ रंग पिवळा, शुभ अंक ६

तूळ:- वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल. तरच काही गोष्टी साध्य करता येतील. प्रतिष्ठित व्यक्तींची गाठ पडेल. नवीन गुंतवणुकीचा पर्याय शोधाल. शुभ रंग लाल, शुभ अंक २

वृश्चिक:- सकारात्मक विचाराने वागावे. व त्याच दृष्टीने कौटुंबिक प्रश्न हाताळावेत. आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. शांततेने गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. अति साहस करायला जाऊ नका. शुभ रंग विटकरी, शुभ अंक ७

धनू:- कौटुंबिक बाबींकडे अधिक लक्ष द्यावे. घरातील वातावरण तप्त राहील. मानसिक चिंतेने ग्रासले जाऊ शकता. जोडीदाराशी वादाचे प्रसंग टाळावेत. हाताखालील लोक सहकार्य करतील. शुभ रंग हिरवा, शुभ अंक ५

मकर:- एकमेकातील समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. मनातील एखादी जुनी आशा पूर्ण होईल. जोडीदाराच्या मताचा आदर करावा. तुमची चिकाटी आज उपयोगी पडेल. उत्साहाने कामे हाती घ्यावीत. शुभ रंग जांभळा, शुभ अंक ९

कुंभ:- संयमाने वागावे. आततायीपणे केलेले काम त्रासाला कारणीभूत ठरेल. जोडीदाराच्या मताशी भिन्नता निर्माण होईल. फार तिखट पदार्थ खाणे टाळावे. अनाठायी खर्च होऊ शकतात. शुभ रंग विटकरी, शुभ अंक ३

Today Horoscope l मीन:- क्षुल्लक गोष्टींवर रागराग करू नका. नातेवाईकांशी संयमाने वागावे. धाडसी निर्णय सारासार विचार करून घ्यावेत. हातातील कलेला वाव द्यावा. करमणुकीच्या गोष्टीत मन रमवा. शुभ रंग पांढरा, शुभ अंक ४

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघ सोडणार?; माजी क्रिकेटपटूचं भाकीत

हिरामंडी सिरिजमध्ये ‘या’ अभिनेत्रीने घेतलं सर्वाधिक मानधन

“पक्ष सोडून भाजपबरोबर गेले तरी उपमुख्यमंत्री केलं आता…”

“…त्याला मी ठार केलं”, ब्रिजभूषण सिंह यांच्या कबुलीने देशभरात खळबळ

नाशिकमध्ये ट्विस्ट; बड्या नेत्याच्या आरोपाने मोठा राजकीय भूकंप