रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघ सोडणार?; माजी क्रिकेटपटूचं भाकीत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | देशात आयपीएलचा 17 वा हंगाम सुरू आहे. क्रिकेट चाहते आयपीएलचा मनमुरादपणे आनंद लुटताना दिसत आहेत. आयपीएलमध्ये (IPL 2024) कडवी टक्कर पाहायला मिळत आहे. प्लेऑफसाठी करो या मरोची परिस्थिती पाहायला मिळत आहे. यंदाच्या आयपीएल हंगाम 2024 (IPL 2024) मधून मुंबई इंडियन्सला बाहेर जावं लागलं आहे. याला संघनायक हार्दिक पांड्या जबाबदार असल्याचं समजतंय.

रोहित शर्माचं कर्णधारपद काढून पांड्याला मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधार पद देण्यात आलं. यामुळे क्रिकेट रसिक आणि रोहित शर्माचे चाहते नाराज झाले आहेत. चाहते पांड्याच्या कामगिरीवर राग राग करत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतंय. पांड्याला मुंबई इंडियन्सचे चाहते हूटिंग करताना दिसत आहेत. रोहित शर्माचे कर्णधार पद काढून घेतल्यानंतर रोहित मुंबई इंडियन्स संघ सोडणार असल्याचं पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसिम अक्रम यांनी भाकीत केलं आहे. (IPL 2024)

काय म्हणाला वसिम अक्रम?

वसिम अक्रमने रोहित शर्माच्या फलंदाजीचे कौतुक केलं आहे. रोहितला आगामी सिझनमध्ये कोलकाताकडून खेळताना पाहायला आवडेल असं तो म्हणाला आहे. मला नाही वाटत की रोहित शर्मा हा मुंबईमधून खेळेल. मला त्याला गौतम गंभीरसोबत खेळताना पाहायचं आहे. केकेआरचा गंभीर मेन्टॉर असेल, श्रेयश अय्यर हा कर्णधार असेल आणि रोहित शर्मा हा सलामिवीर फलंदाज असेल, असं अक्रम म्हणाला आहे. (IPL 2024)

कोलकातामध्ये रोहित शर्मा हा चांगली फलंदाजी करतो. म्हणून त्याला कोलकातामध्ये पाहणं हे चांगलं असेल. यंदाच्या हंगामात रोहितला म्हणावी अशी कामगिरी करत आली नाही. रोहित आणि इशानने चांगली सुरूवात केली. मात्र मिडल ऑर्डरवर खेळणाऱ्या खेळाडूंना मैदानावर ताबा मिळवता आला नाही.

मुंबई इंडियन्स प्ले ऑफमधून बाहेर

सनरायझर्स हैदराबादने लखनऊचा पराभव केल्यानंतर मुंबई इंडियन्स हा संघ प्ले ऑफमधून बाहेर पडला आहे. यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते संघाच्या खेळीवर नाराज आहेत. आयपीएलमधून बाहेर पडणारा मुंबई इंडियन्स हा पहिलाच संघ आहे.

News Title – IPL 2024 Wasik Akram Statement About Rohit Sharma Leave Mumbai Indians

महत्त्वाच्या बातम्या

उन्हाळ्यात डोकेदुखीचा त्रास होतोय?, ‘या’ उपायांमुळे मिळेल आराम

मुंबई इंडियन्समधील भांडण अखेर समोर, खेळाडूंनी केली पांड्याची तक्रार

“15 सेकंद पोलीस हटवा, कुठे गायब व्हाल कळणारही नाही”; नवनीत राणांचं ओवैसींना थेट आव्हान

“4 जूननंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेलमध्ये जाणार”

मिनी फोल्डिंग ई-बाईक, किंमत फक्त… किंमत ऐकून चकीत व्हाल